फसवणुकीचा गुन्हा : गावातील पाणी योजनेत बनावट कागदपत्रे दाखल करणे पडले महागात

फसवणुकीचा गुन्हा : गावातील पाणी योजनेत बनावट कागदपत्रे दाखल करणे पडले महागात

जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा-डोणवाडा येथील प्रकार, एका ग्रामपंचायत सदस्यासह एजन्सी धारकावर फसवणुकीचा गुन्हा 

जिंतूर : येथील भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस तथा बलसा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पिराजी इलग व परतूर येथील पद्मनाभस डेव्हलपर्स प्रो.प्रा.किशोर विजयकुमार कद्रे यांच्यावर जलजीवन मिशन अंतर्गत बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी विविध कलमान्वये बुधवारी, २१ सप्टेंबर रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी : ग्रामपंचायत पिंप्राळा-डोणवाडा ता.जिंतूर येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे ४४,४४,४९९/ रुपयाचे काम मंजूर झाले होते. सदर कामाची रीतसर निविदा जिल्हा परिषद परभणी यांच्या मार्फत निघाली होती. त्यामध्ये किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स प्रो.प्रा. परतूर यांना सदर काम सुटले होते. परंतु; पुढील प्रक्रियेस गावातील जनतेकडून १०% लोकवर्गणी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन जलजीवन मिशन बँकेच्या खात्यात जमा करणे आवश्यक असते. त्यासाठी लक्ष्मण पिराजी इलग रा.बलसा व किशोर विजयकुमार कद्रे पद्मनाभस डेव्हलपर्स प्रो.प्रा. परतूर यांनी ग्रामपंचायत पिंप्राळा- डोणवाडाच्या सरपंच जयश्री शिवाजी चाफे व ग्रामसेवक एस.डी.इंगळे यांना विचारात न घेता खोट्या सह्या व शिक्का मारून बोगस कागदपत्राच्या आधारे कामाची वर्क ऑर्डर करून घेतली होती. त्या अनुषंगाने सरपंच यांनी सदर बोगस कागदपत्रावर आक्षेप घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रीतसर सखोल चौकशी केली असता, सदर कंत्राटदार दोषी आढळून आला, त्यामुळे सदर कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा.अशा आशयाचे पत्र सरपंच यांना देण्यात आले. त्यानंतर सरपंच यांनी पोलीस स्टेशन जिंतूर येथे जाऊन स्वतः जबाब नोंदवून फिर्याद दिली,असता पोलीस स्टेशन जिंतूर यांनी दोन्ही आरोपी विरुध्द कलम, ४२०,४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!