PM Narendra Modi : गंगाखेडच्या चिमुकलीला पत्र लिहून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

PM Narendra Modi : गंगाखेडच्या चिमुकलीला पत्र लिहून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

गंगाखेड : चिमुकलीच्या कुटुंबियांमध्ये आनंदोत्सव 

परभणी, गंगाखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगाखेड येथील एक वर्षाच्या चिमुकलीला चक्क पत्र लिहून वाढदिवसाची शुभेच्छा भेट दिली आहे. अत्यंत व्यग्रतेमधून वेळ काढून पंतप्रधान मोदींनी दिलेल्या या संस्मरणीय पत्र भेटीने मुलीच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ओजस्वी गोपाळ मंत्री असे या चिमुकलीचे नाव आहे. गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगरातील रहिवासी, सरस्वती विद्यालयातील शिक्षक गोपाळ मंत्री व अभिलाषा यांची कन्या ओजस्वीचा पहिला वाढदिवस १७ सप्टेंबर २०२२ रोजी होता. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे. या अनुषंगाने गोपाळ मंत्री यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मुलीलाप्रत्यक्ष आशीर्वाद देण्यासंबंधी विनंती करणारे पत्र लिहिले होते. परंतु; सुरक्षेच्या कारणास्तव भेट नाकारण्यात आली. मात्र; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवणीने पत्राद्वारे शुभेच्छा दिल्याने मंत्री कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यग्र असतो. मात्र; खूप कमी लोकांना हे माहीत आहे, की त्यांना जेव्हा कधी संधी मिळते, तेव्हा ते वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देतात. हे विशेष.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!