दर्शनयात्रा : डॉ.संंजय रोडगे यांनी घडविला जाणीवांचा जागर

दर्शनयात्रा : डॉ.संंजय रोडगे यांनी घडविला जाणीवांचा जागर

रवळगाव : पितृछत्र हरवलेल्या लक्ष्मीला घेतले दत्तक, ३७०० महिलांना घडविले रेणुकामातेचे दर्शन

दर्शनयात्रा : डॉ.संंजय रोडगे यांनी घडविला जाणीवांचा जागर

Authoerd By Babasaheb helaskar

सेलू,जि.परभणी : नवरात्र महोत्सवानिमित्त रवळगावच्या पंचक्रोशीतील महिला व मुलींकरिता डॉ.संजय रोडगे मित्र मंडळाच्या पुढाकाराने आई महोत्सवाअंतर्गत, मंठा येथील रेणुकामाता देवी दर्शनयात्रेच्या माध्यमातून सामाजिक जाणीवांचा जागर घालण्याता आला. मंगळवारपासून (२७ सप्टेंबर)‌ सुरू झालेल्या या स्तुत्य उपक्रमातंर्गत ३७०० महिलांना रेणुकामातेचे दर्शन घडविण्यात आले. डॉ.संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 
रवळगाव सर्कल मधील लाडनांद्रा, गोहेगाव, डासाळा, आहेर बोरगाव, सिद्धनाथ बोरगाव, खवणे पिंपरी, रवळगाव, वाकी, वाघ पिंप्री, शिंदे टाकळी, माले टाकळी, राधे धामणगाव, म्हाळसापूर परिसरातील महिला, जेष्ठ महिला व मुलींनी या दर्शनयात्रेत सहभाग घेतला. रविवारी ( दोन ऑक्टोबर) यात्रेनिमित्त विद्याविहार संकुलात कार्यक्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वडिलाचे छत्र हरवलेल्या डासाळा येथील गरीब कुटुंबातील मुलगी लक्ष्मी भुजंगराव बोंबले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. डासाळा येथील ग्रामस्थांनी लक्ष्मीची हतबल आर्थिक परिस्थिती या वेळी कथन केली. ती ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. याच वेळी सामाजिक जाणीवेतून डॉ.संजय रोडगे यांनी लक्ष्मीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत, तिला दत्तक घेतले. डॉ.रोडगे यांनी यापूर्वी देखील दोन मुलींना दत्तक घेतलेले असून, त्यांच्या शिक्षणाचा खर्चदेखील ते उचलित आहेत. ग्रामीण भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींना प्राधान्याने प्रवेश देऊन मोफत शिक्षण व्यवस्था डॉ.रोडगे यांनी उपलब्ध करुन दिली आहे. कार्यक्रमाला सारंगधर महाराज, डॉ.सविता रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे-पारवे, अजय डासाळकर, रघुनाथ बागल, सरपंच दीपक रोडगे, उत्तमराव गजमल, दिपक गजमल, बाळू कदम, प्रभाकर गजमल, संजय गजमल, शेख गुलदिन, किसन बागल,राजीव बागल, मच्छिंद्र फासाटे, पवन गजमल, योगेश खराबे, अनिल हिवाळे, जगन गजमल, रमेश घाडगे,, बाबा गजमल, रामेश्वर गजमल, राम बोंबले, बद्रीनाथ ताठे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन भरत रोडगे, तर आभार दीपक रोडगे यांनी मानले.

लक्ष्मीची परिस्थिती ऐकल्यानंतर सामाजिक जाणीवेतून डॉ.संजय रोडगे यांनी लक्ष्मीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत, तिला दत्तक घेतल्याचे सांगितले. सारे वातवरण भावनिक झाले. डॉ.रोडगे यांनी यापूर्वी देखील दोन मुलींना दत्तक घेतलेले असून, त्यांच्या शिक्षणाचा खर्चदेखील ते उचलित आहेत. ग्रामीण भागातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींना प्राधान्याने प्रवेश देऊन मोफत शिक्षण व्यवस्था डॉ.रोडगे यांनी उपलब्ध करुन दिली आहे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!