लोकार्पण : सायखेडा येथे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुढाकाराने सभामंडपाचे काम पूर्ण 

 

लोकार्पण : सायखेडा येथे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुढाकाराने सभामंडपाचे काम पूर्ण 

गावकऱ्यांनी व्यक्त केले आभार, कार्यक्रमाला मोठी उपस्थिती 

सेलू : जिंतूर तालुक्यातील मौजे सायखेडा तांडा येथे जिल्हा परिषद अंतर्गत सभामंडपाचे काम पूर्ण झाले, असून इमारतीचे लोकार्पण माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते रविवारी, दोन ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. मौजे सायखेडा येथील गावातील नागरिकांची बऱ्याच दिवसापासून तांड्यावर सभामंडप बांधकाम करून देण्याची मागणी होती. त्या अनुषंगाने भांबळे यांनी लक्ष घालून सभामंडप मंजूर करून घेतला व काम पूर्ण करून घेतले. याबद्दल गावातील नागरिकांनी भांबळे यांचे आभार व्यक्त केले. या वेळी बोलताना भांबळे यांनी सांगितले, की माझ्या कार्यकाळात जिंतूर-सेलू तालुक्यात दोनशे पेक्षा जास्त सभागृह मंजूर करून काम पूर्ण केले आहेत, तर मागील पाच वर्षाच्या काळात सहा हजार गरजू लाभार्थ्यांना पगारी सुरु केल्या आहेत. परंतु, सध्याच्या काळात एकही पगारीची बैठक झाली नाही तसेच तालुक्यात फक्त एकच दुधगाव दुष्काळ जाहीर झाले आहे. दुष्काळामधून जिंतूर सेलू तालुके वगळण्यात आले आहेत, एम.एस.ई.बी.ची दोन्ही तालुक्यात वाईट परिस्थिती आहे. जिंतूर सेलू तालुक्यातील पिक विम्यापासून देखील शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यासाठी विद्यमान आमदार यांनी काहीही प्रयत्न केला नाही. परंतु, तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास असून आहे, नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर असून यापुढे देखील विकास कामांसाठी कधीही कमी पडणार नाही. कार्यक्रमाला मनोज थिटे, गणेशराव इलग. मधुकर भवाळे, विजय खिस्ते, शंकर जाधव, रमेश गिते,बी जि चव्हाण, सलीम काझी, जलील इनामदार, सुलेमान, जिवन भवरे, अमोल खाडे, भारत माने, अविनाश मस्के, भास्कर शिंदे, वसंत मगर, पंडित जाधव, तुकाराम दहिभाते, दिनकर दहिभाते, विजय गडदे, सिद्धार्थ कोसे, बाबासाहेब खुळे, पिंटू मोहिते, एकनाथ खोसे, गोविंद राठोड, पिंटू राठोड, गजानन राठोड, बाबुराव जाधव, मांगीलाल राठोड, गुलाब राठोड, विलासराव बुधवंत, कैलास बुधवंत, आसाराम बुधवंत, तुकाराम आढे, महादू आघाव, प्रभाकर चक्कर, मनोहर बुधवंत, उत्तम राठोड, लहू राठोड, विष्णू राठोड, ज्ञानेश्वर राठोड यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!