गुणवंतांचा गौरव : सेलूतील सौ.सावित्रीबाई बिहाणी नूतन शाळेतील गुणवंतांचा सत्कार
पालक शिक्षक संघाचा उपक्रम, बक्षीसे देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार
परभणी : सेलू येथील सौ.सावित्रीबाई बद्रीनारायण बिहाणी नूतन प्राथमिक शाळेतील पालक शिक्षक संघातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, कृष्ण रूप सज्जा स्पर्धा व महिला पालकांसाठीची रांगोळी स्पर्धा; तसेच शाळेतील अनया विजय ढाकणे या विद्यार्थिनीला निसर्गाची शाळा मार्फत दिला जाणारा पद्मभूषण राम सुतार पुरस्कार 2022 प्राप्त झाल्याबद्दल बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी म्हणून पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष रोहिणी महाजन, तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष मकरंद दिग्रसकर, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे, अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे, पालक शिक्षक संघाचे चिटणीस रमेश काळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सुखानंद बेंडसुरे यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली कुबरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. शिक्षक, कर्मचारी प्रल्हाद पवार यांनी सहकार्य केले.