ग्राहक चळवळ : बळकट करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा 

ग्राहक चळवळ : बळकट करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा 

डॉ.विलास मोरे : सेलू महिला मंडळाचा  महिला मेळावा

सेलू (जि.परभणी) : येथील सेलू महिला मंडळाच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा समारोप शुक्रवारी, 7 ऑक्टोबर रोजी पार पडला. या वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डाॅ.विलास मोरे यांनी ग्राहक पंचायत व ग्राहक संरक्षण कायदा या अनुषंगाने अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ.मोरे म्हणाले,  ” ग्राहक चळवळ सक्षमीकरणासाठी महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अधिकाधिक महिलांनी ग्राहक पंचायत सदस्य होऊन चळवळ बळकट करावी.”

महिलांना खरेदी करताना घ्यावयाची काळजी, जिल्हा आयोगात कोणत्या प्रकारची तक्रार दाखल करू शकतो, वस्तू कुठे खेरदी केली, तरी आपण आपल्या राहात्या ठिकाणी तक्रार करू शकतो, कंझ्यूमर एप व टोल फ्री क्रमांकावर तक्रार कशी करावी, या संदर्भात डॉ. मोरे यांनी सविस्तर माहिती दिली. कोणतीही वस्तू खरेदी करताना बील अवश्य घ्यावे; तसेच ग्राहक चळवळ अधिकाधिक सक्षम व बळकट करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची ऑनलाईन सदस्य नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी प्रा.सुषमा सोनी, ग्राहक पंचायतच्या जिल्हा उपाध्यक्षा किरण सोळंके, सेलू तालुका उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, संघटन मंत्री गायकवाड, तालूका सचिव मंजुषा कुलकर्णी, महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर, सचिव ललिता गिल्डा, रोहिणी कुलकर्णी, अनुपमा देवधर, उज्ज्वला धर्माधिकारी, मधुरा खारकर, रजनी सुभेदार, करूणा बागले, मनिषा खारकर, सरिता उमरीकर, मीरा देशमुख, शिला दिक्षीत, निर्मला लिपणे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ग्राहक चळवळ : बळकट करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा 

डॉ.विलास मोरे : सेलू महिला मंडळाचा  महिला मेळावा

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!