Free Medicines : सेलूत २२० दमा रूग्णांना औषधी वाटप
संत गोविंद बाबा दादुपंथी मठ गोशाळेचा उपक्रम
सेलू, जि.परभणी : येथील श्री संत गोविंद बाबा दादुपंथी मठ गोशाळा व बैद्यनाथ आयुर्वेदिक कंपनीच्यावतीने दम्याच्या २२० रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली. रविवारी ०९ आक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रात्री १२ वाजता औषधी वाटपाला सुरुवात झाली. मातीच्या पात्रात गायीचे दुध, मुळ्याची भाजी व औषधी देण्यात आली. रात्री ९ ते १२ यावेळेत प्रा.संजय महाराज पिंपळगावकर, मारोतीआप्पा भिसे, सदाशिव जाधव, केदार तांबट, रमेश बहिटे, दत्ता पवार यांच्या भजन संध्या कार्यक्रम झाला. पत्रकार अबरार बेग, श्रीपाद कुलकर्णी; तसेच प्रदिप जाधव, वसंत डख, अंशुकुमार यांनी अनुभव कथन केले. सूत्रसंचालन भगवान पावडे यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेंद्र करवा, सूर्यकांत जाधव, गणेश भागडे, गोविंद शेलार, श्रीनिवास काबरा, आनंद सोनी, राधेश्याम राठी, शैलेश तोष्णीवाल, दिपक पवार, विजय पांडे, कृष्णा काटे, बबलू दायमा, शिवनारायण मालाणी आदींनी परीश्रम घेतले.