आज कार्यसन्मान : रामप्रसाद घोडके, जयप्रकाश बिहाणी, ललिता गिल्डा यांचा आज सेलूत कार्यसन्मान
सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजन, उपस्थित राहाण्याचे आवाहन
सेलू,जि.परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्यावतीने मंगळवारी, ११ ऑक्टोबर रोजी उद्योजक रामप्रसाद घोडके, जयप्रकाश बिहाणी, ललिता गिल्डा यांचा कार्यसन्मान होत आहे. साई नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता हा सोहळा आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ अशोक सोनी यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी परमवीर अब्दुल हमीद पुरस्काराने गौरान्वित उद्योजक रामप्रसाद घोडके, महेश भूषण पुरस्काराबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, विशेष सेवा गौरव पुरस्कारप्राप्त सेलू महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा यांचा कार्यसन्मान करण्यात येणार आहे. समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, संयोजक डॉ.शरद कुलकर्णी व कार्यकारी मंडळाने केले आहे.