टेनिस व्हॉलीबॉल : राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची सोनेरी कामगिरी, एकेका रौप्य व कांस्यपदकाचीही लयलूट
२४ व्या राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल : तिरुचिरापल्ली रंगल्या स्पर्धा, १९ राज्यांचा सहभाग
परभणी : टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया मान्यतेने तामिळनाडू टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान तिरुचिरापल्ली येथे २४ व्या राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. देशभरातून १९ राज्य संघांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सबज्युनिअर मुली, ज्युनिअर मुली व ज्युनिअर मिश्र दुहेरी गटांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली, तर सबज्युनिअर मिश्रदुहेरीत रौप्य आणि सबज्युनिअर मुले गटात कांस्यपदक प्राप्त केले.
ज्युनिअर मुली गटात अंतिम सामना महाराष्ट्र वि.गुजरात अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने २-१ सेट मध्ये निकीता थावरे, निता थावरे, अंकिता थावरे, आव्हानी जाधव या खेळाडूंनी विजय खेचून आणला. मिश्र दुहेरीत गटात अंतिम महाराष्ट्र वि.आंध्रप्रदेश दरम्यान २-० सरळ सेटमध्ये रावल जान्हवी व यादव अविनीश जोडीने सुवर्णपदक पटकावले. सबज्युनिअर मुलींच्या गटात अंतिम लढत महाराष्ट्र वि. तेलंगणा दरम्यान अतितटीच्या लढतीत २-१ अशा कर्णधार दिपाली देशमुख,समीक्षा कदम,स्नेहा थावरे, राधा वारुळे, महेक बागवान, साईसमीता जवळकर या खेळाडूंनी विजयश्री खेचून आणली. सबज्युनिअर मिश्रदुहेरी गटात अंतिम सामना आंध्रप्रदेश वि महाराष्ट्र दरमान्य २-१ असे सेट मध्ये महाराष्ट्र राज्य संघास पराभूत होऊन रौप्यपदक सय्यद साद सादिक व वैष्णवी काकडे या जोडीने पटकावले. सबज्युनिअर मुले गटात उपांत्य फेरीत पराभूत होऊन कांस्यपदका साठी यजमान तामिळनाडू सोबत झुंज देऊन महाराष्ट्र राज्य संघास कांस्यपदक पटकाविले यात कर्णधार माळकर सार्थक, दुधाटे विशाल, गायके उमेश, ठाकरे हिमांशू, गायकवाड अनिकेत ,गायके आर्यन यांचा समावेश होता.ज्युनिअर मुलांच्या संघांनी साखळी सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. यात कदम विठ्ठल चुडावकर महेश, थावरे गोविंद, थावरे हर्षवर्धन, परीयार आयुष, पवार शुभम यांचा समावेश होता. या संघास मार्गदर्शन सतिश नावाडे, सय्यद सिकंदर (परभणी), स्नेहा जाधव (अकोला), प्राची कडणे (सांगली), संघ व्यवस्थापक मंदार कुस्टे (कोल्हापूर) यांचे लाभले.सर्व खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन टेनिस व्हॉलीबॉल आंतरराष्ट्रीय महासंघाचे महासचिव: डॉ.व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यातमवार, राज्य चिटणीस गणेश माळवे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिल सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, मुख्याधिकारी देविदास जाधव, नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम लोया, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, मुख्याध्यापक नारायण सोळंके, प्रा.नागेश कान्हेकर, राज्य सदस्य संजय ठाकरे, रामेश्वर कोरडे यांनी कौतुक केले केले.