SMC Election : सेलू तालुक्यातील ‘या’ गावच्या शाळेची निवडणूक पोलिसांच्या उपस्थितीत

SMC Election : सेलू तालुक्यातील ‘या’ गावच्या शाळेची निवडणूक पोलिसांच्या उपस्थितीत

सेलू : देवगाव फाटा शाळेच्या अध्यक्षपदी गोविंद मोरे, शिवाजी मोरे उपाध्यक्ष

सेलू,जि.परभणी : यंदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शालेय व्यवस्थापन समित्यांच्या (School Management Committee) निवडी राजकीय हस्तक्षेपामुळे चांगल्याच गाजल्या. देवगाव फाटा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समीतीच्या निवडीच्या वेळी तणाव निर्माण झाल्याने चक्क पोलीसांना बोलवावे लागले. अखेर अध्यक्षपदी गोविंद मोरे, तर उपाध्यक्षपदी शिवाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
देवगाव फाटा येथील शालेय व्यवस्थापन समिती निवड प्रक्रिया गेल्या शुक्रवारी, आठ ऑक्टोबर रोजी काहीशा तणावपूर्ण वातावरणात पार पडली. मुख्याध्यापक मधुकर कटारे, शिक्षक मारोती कपाटे, कल्पना गाडेकर यांनी वर्ग निहाय पालक सदस्य निवड प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी तणाव वाढत असल्याचे लक्षात आले. यासंदर्भात पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड यांना माहिती देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक विनोद साने, अजय राजकटला शाळेत दाखल झाले. त्यानंतर पालक सदस्य निवडीची मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. त्यात ग्रामपंचायत गटाचे ९ पैकी ९ सदस्य विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये गोविंद मोरे, शिवाजी मोरे, सुरेश जाधव, मारोती कर्‍हाळे, शामल दत्ता गिरी, दुर्गा गणेश सातपुते, सुरेखा संदिप भवर, उर्मीला भारत बहिरट, वंदना राहुल खंदारे यांचा सामावेश आहे. सदस्य निवडीनंतर लगेचच केंद्रप्रमुख शरद ठाकर, मुख्याध्यापक मधुकर कटारे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांची सभा घेण्यात आली. अध्यक्षपदी गोविंद दिनकरराव मोरे, तर उपाध्यक्षपदी शिवाजी उत्तमराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून राधा नागनाथ साळेगावकर, शिक्षणतज्ञ म्हणून लक्ष्मण सोन्ने यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बाबुअप्पा साळेगावकर, रामेश्वर बहिरट, मोकिंदरव मोरे, भगवानराव सातपुते, विठ्ठल सातपुते, नागनाथ साळेगावकर, राजेभाऊ पवार, राधाकिशन मोरे, अमोल सातपुते, प्रसाद मोरे, काशिनाथ मोरे, गजानन मोरे, रमेश महाराज मोरे, छत्रुग्न मोरे यांची उपस्थिती होती. फटाक्यांची आतषबाजी करीत निवडीचा आनंद साजरा करण्यात आला.

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व विजय भांबळे यांनी या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्य निवडीत विशेष लक्ष घातल्याने, निवडणूक प्रतिष्ठा वाढली.अखेर बोर्डीकर गटाच्या सदस्यांची शालेय समितीत वर्णी लागली.

SMC Election : सेलू तालुक्यातील 'या' गावच्या शाळेची निवडणूक पोलिसांच्या उपस्थितीत

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!