चिंतनशील : शिक्षणातून जीवन मूल्यांचे संवर्धन व्हावे : ॲड.अशोक सोनी
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्यावतीने उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, रामप्रसाद घोडके, ललिता गिल्डा यांचा कार्यसन्मान सोहळा थाटात…
सेलू,जि.परभणी : संस्कार, विचाराने समृद्ध माणसे सेलू शहराचे वैभव आहे. यामध्ये आठ दशकांपासून गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा जोपासणार्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे योगदान मोठे आहे. अशाच जीवन आणि मूल्य शिक्षणाच्या संवर्धनाची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन परभणी येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.अशोक सोनी यांनी मंगळवारी (११ ऑक्टोबर) केले.
विविध सामाजिक पुरस्कारांनी गौरान्वित नूतन संस्थेचे सहचिटणीस तथा उद्योजक जयप्रकाशजी बद्रिनारायणजी बिहाणी, उद्योजक रामप्रसादजी बापूराव घोडके, सेलू महिला मंडळाच्या सचिव ललिता राजेंद्रजी गिल्डा यांचा, सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्यावतीने कार्यसन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सुताचा हार, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व ग्रंथ भेट असे सन्मानाचे स्वरूप होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरूजी, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, श्रीमती सावित्रीबाई बिहाणी, मीरा घोडके, किरण बिहाणी, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. साई नाट्य गृहात सायंकाळी आयोजित या सोहळ्याच्या निमित्ताने नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले.
प्रारंभी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ, दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांना अभिवादन करण्यात आले. अॅड.अशोक सोनी म्हणाले,” पूर्वजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीची असते. जिथे अंधार आहे. तिथे उजेड घेऊन जाणे, हे मानवीय कर्तव्य आहे, असेच कार्य बिहाणी, घोडके, गिल्डा परिवाराकडून होत आहे.” या वेळी प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांनी गौरवपर मनोगत व्यक्त केले. जबाबदारीचे भान आणि अधिक सचोटीने कार्य करण्याची ऊर्जा साठविण्याचे बळ अशा सन्मान सोहळ्यातून मिळते, असे जयप्रकाशजी बिहाणी, रामप्रसाद घोडके, ललिता गिल्डा यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. आदर्श डॉक्टर पुरस्काराबद्दल परभणीचे डॉ.विनोद मंत्री यांचाही संस्थेतर्फे या वेळी सन्मान करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, मिलिंद सावंत, प्राचार्य द.रा.कुलकर्णी, प्रा.एच.एस.दरगड यांनी जयप्रकाशजी बिहाणी, रामप्रसाद घोडके, ललिता गिल्डा यांचा सत्कार केला. परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय घोडके यांनीही मान्यवरांचा सत्कार केला. सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन, गिरीश दीक्षित व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. प्रास्ताविक डॉ.विनायकराव कोठेकर, सूत्रसंचालन अशोक लिंबेकर, तर डॉ.शरद कुलकर्णी यांनी आभार मानले. सच्चिदानंद डाखोरे यांनी गायलेल्या, धन्य भाग सेवा का अवसर पाया…भैरवीने सांगता झाली. कार्यक्रमासाठी संस्थेतील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी व संयोजन समितीने परिश्रम घेतले. गणेशोत्सव व्याख्यानमालेचे गंगाधर कान्हेकर यांनी सोशल मिडिया संयोजन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांची उपस्थिती होती.
या वेळी प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांनी गौरवपर मनोगत व्यक्त केले. जबाबदारीचे भान आणि अधिक सचोटीने कार्य करण्याची ऊर्जा साठविण्याचे बळ अशा सन्मान सोहळ्यातून मिळते, असे जयप्रकाशजी बिहाणी, रामप्रसाद घोडके, ललिता गिल्डा यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले.
![]()
(छायाचित्र : शंभू काकडे, सेलू)