UPSC : ‘नूतन’चे माजी विद्यार्थी डॉ.पवन खेडकर यांचे युपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश
सेलूच्या लौकिकाला साजेशी कामगिरी कौतुकास्पद, डॉ.खेडकरांचे होतेय सर्वत्र अभिनंदन…
सेलू जि.परभणी : येथील रहिवासी आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ.पवन रंगनाथ खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. डॉ.पवन हे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण नूतन संस्थेमध्ये झालेले आहे. पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती, प्रज्ञा शोध, माध्यमिक शालांत परीक्षांसह विविध स्पर्धा परीक्षेतून खेडकर यांनी आपली गुणवत्ता समृद्ध केली. सध्या ते मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांचे वडील रंगनाथ खेडकर हे जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आहेत. डॉ.पवन यांनी २०२१ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. परंतु; केवळ एकच गुण कमी पडल्याने ते पहिल्या निवड यादीत स्थान मिळवू शकले नाहीत, असे खेडकरांच्या वडिलांनी सांगितले. दुसरी प्रतीक्षा यादी मंगळवारी, 11 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. त्यात डॉ.खेडकरांनी शिफारसपात्र ठरत, यशाला गवसणी घातली आहे. ‘एका’च गुणाचे परिमाण…खर्या अर्थाने डॉ.पवन खेडकर यांनी दाखविलेल्या संयम अन् चिकाटीने सिद्ध केले. हेच विशेष ! कौतुकास्पद आहे. डॉ.खेडकरांच्या या संस्मरणीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
केवळ एकच गुण कमी पडल्याने डॉ. पवन खेडकर पहिल्या निवड यादीत स्थान मिळवू शकले नाहीत. परंतु; दुसरी प्रतीक्षा यादी मंगळवारी, 11 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. त्यात डॉ.खेडकरांनी शिफारसपात्र ठरत यशाला गवसणी घातली आहे. ‘एका’च गुणाचे परिमाण…खर्या अर्थाने डॉ.पवन खेडकर यांनी दाखविलेल्या संयम अन् चिकाटीने सिद्ध केले. हेच विशेष ! कौतुकास्पद आहे.