Health First : रविवारी सेलूत मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
डॉ.संजय दादा रोडगे मित्र मंडळ व संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जालना यांचा संयुक्त उपक्रम
सेलू जि.परभणी : डॉ संजय दादा रोडगे मित्र मंडळ आयोजित व संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर, रविवार रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम प्रतिष्ठान विद्याविहार संकुल रवळगाव रोड येथे हे शिबिर आहे. शिबिरात नवजात शिशुचे सर्व आजार लहान मुलांचे मेंदू ज्वर व निमोनिया मधुमेह व किडनीचे आजार हृदयाचे गंभीर आजार डायलोसिस अमोनिया, डेंगूचे आजार, आतड्यांची शस्त्रक्रिया वंधत्व उपचा, मुतखडा शस्त्रक्रिया प्रोस्टेटची ग्रंथी शस्त्रक्रिया, अर्थोस्कोपी स्तनाचा व गर्भाशयाचा कॅन्सर, हाडांचे सर्व उपचार अपघात व फ्रॅक्चर, मद्यपानामुळे खराब झालेली लिव्हर, डोक्यांचा मार शस्त्रक्रिया, कॅन्सरचे उपचार व केमोथेरपी, दमा फुफ्फुसाचे आजार आदी आजाराविषयी मोफत तपासणी शिबिर व मार्गदर्शन केले जाणार आहे. अंजोप्लास्टी बायपास सर्जरी वाल रिप्लेसमेंट मोफत केले जाणार आहे. शिबिरात डॉ.बळीराम बागल, डॉ.मनीष देशमुख, डॉ. हुपेश जाधव, बालरोग तज्ञ डॉ.शिवदास मिरकड, डॉ. कैलास राजगुरू डॉ.श्याम बागल, अस्थिरोग तज्ञ डॉ.गणेश पारवे, डॉ.अरविंद मस्के, डॉ.निशान गोयल, स्त्रीरोग तज्ञ डॉ.अपूर्वा रोडगे, डॉ अंकुश पावा, त्वचारोग तज्ञ डॉ.गोयल, डॉ.शितल दाभेराव, डॉ.श्रीराम वानखेडे, डॉ.तुषार अग्रवाल रेडिऑलॉजी तज्ञ डॉ.शिवाजी पोले, डॉ.प्रणव वंजारी, हृदयरोग तज्ञ डॉ.विष्णू भुते, हृदय व शल्यचिकित्सक डॉ.सुहद अन्नछत्रे डॉ.दीपक भावसार, डॉ.राजेंद्र राख व डॉ.मिलिंद काठोळे हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.