विवेकानंद विद्यालय : मुख्याध्यापकपदी शंकर शितोळे
सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी शंकर रामकृष्ण शितोळे यांची पदोन्नतीद्वारे निवड करण्यात आली. शितोळे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक विद्यालय बीड येथे ३० वर्ष सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले; तसेच स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेलूरकर, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी यांनी यांची उपस्थिती होती.