राष्ट्रीय पुरस्कार : सेलूतील देवगिरी‌ बँकेच्या श्रावण भवर यांच्या काव्यप्रतिभेचा सन्मान

राष्ट्रीय पुरस्कार : सेलूतील देवगिरी‌ बँकेच्या श्रावण भवर यांच्या काव्यप्रतिभेचा सन्मान

‘श्रावण सर’ या काव्यसंग्रहाला पुरस्कार : औरंगाबाद येथे झाला सन्मान, मान्यवरांची उपस्थिती

सेलू,जि.परभणी : सेलूतील देवगिरी‌ नागरी सहकारी बँकेतील श्रावण सखूबाई रंगनाथराव भवर यांच्या ‘श्रावण सर’ या काव्यसंग्रहाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, शब्दगंध समूह प्रकाशन, औरंगाबाद आणि आम्रपाली प्रकाशन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बेस्ट राईटर नॅशनल अवॉर्ड यंदा श्रावण सखूबाई रंगनाथराव भवर यांच्या श्रावण सर या काव्य संग्रहाला मिळाला आहे. मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे ९ ऑक्टोबर २०२२रोजी सिनेअभिनेत्री रुपाली पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृति चिन्ह आणि सन्मान पत्र असे स्वरूप होते. या वेळी अरूण घोडेराव, प्रसिद्ध साहित्यिक आनंद अहिरे, शब्दगंध प्रकाशनचे संदीप त्रिभुवन, आम्रपाली प्रकाशनचे लखन काशीकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुरस्काराबद्दल  देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोरजी शितोळे, उपाध्यक्ष प्रा.संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर, दत्ता शिंदे, रुपेंद्र कोयालकर, विष्णू खाडे, देवगिरी बँक कर्मचारी संघ, गणेश भवर, कैलास भवर प्रा.डॉ.पी.आर.रोकडे,‌ सुनील झंवर, चिखली बँकेचे सुरंगळीकर आदींनी भवर यांचे अभिनंदन केले आहे.

सेलू,जि.परभणी : सेलूतील देवगिरी‌ नागरी सहकारी बँकेतील श्रावण सखूबाई रंगनाथराव भवर यांच्या 'श्रावण सर' या काव्यसंग्रहाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले Election : सेलू तालुक्यातील 'या' गावच्या शाळेची निवडणूक पोलिसांच्या उपस्थितीतसेलू,जि.परभणी : सेलूतील देवगिरी‌ नागरी सहकारी बँकेतील श्रावण सखूबाई रंगनाथराव भवर यांच्या 'श्रावण सर' या काव्यसंग्रहाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!