राष्ट्रवादी युवती काँग्रेस :प्रेक्षा भांबळे यांचा लियाफी विमा संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा
आंदोलन स्थळी दिली भेट, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
परभणी : जिंतूर शहरातील भारतीय जीवन विमा निगम सेटलाईट ब्रांच समोर गेल्या तीन दिवसापासून विमा प्रतिनिधींच्या लियाफी संघटनेच्यावतीने विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव उबाळे, माजी नगरसेवक संजय निकाळजे, आशाताई उबाळे, माजी मुख्य प्रशासक मनोज थिटे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काजळे आदींची उपस्थिती होती. विमा प्रतिनिधींच्या अडचणी ऐकून घेतल्या व माजी आमदार विजय भांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सर्व मागण्या बाबत सविस्तर सांगून केंद्र सरकारकडून या मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहेत, असे आश्वासन प्रेक्षा भांबळे यांनी दिले. या वेळी विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.