मोफत तपासणी : सेलूतील आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद‌, डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळाचा उपक्रम 

मोफत तपासणी : सेलूतील आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद‌, डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळाचा उपक्रम  

शहर, ग्रामीण भागातील हजारांवर रुग्णांनी घेतला लाभ; संजीवनी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य

सेलू जि.परभणी : डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळ व संजीवनी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू (जि.परभणी) येथे १६ ऑक्टोबर रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास रवळगाव सर्कल मधील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ११५३ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा वाशीम जिल्हा पक्षनिरीक्षक डॉ.संजय रोडगे होते. उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद बांधकाम सभापती अशोक नाना काकडे, माजी नगरसेवक मिलिंद सावंत, डॉ.सविताताई रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे (पारवे ), डॉ.आदित्य रोडगे; तसेच जालना येथील संजीवनी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉ.बळीराम बागल, डॉ.मनीष देशमुख, डॉ.हुपेशी जाधव, डॉ.शिवदास मिरकड, डॉ.कैलास राजगुरू, डॉ.शाम बागल, डॉ.अरविंद म्हस्के पाटील, डॉ.निशांत गोयल, डॉ.अंशुल गोयल,डॉ.श्रीराम वानखेडे डॉ.विष्णू भुते, डॉ.सुहृद अन्नछत्रे , डॉ.दीपक क्षिरसागर, डॉ.शिवाजी पोले, डॉ.प्रणव वंजारी, डॉ.राजेंद्र राख , डॉ.मिलिंद काटोले, डॉ.शीतल दाभेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माझ्या ग्रामीण भागातील जनतेला जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, जे आपल्या अन्न,वस्त्र व निवारा या बाबीदेखील आपल्या उत्पन्नातून पूर्ण करू शकत नाहीत.,व जे पैशाअभावी आजारावर उपचार करू शकत नाहीत. अशा सर्व गरजू जनतेला त्यांचे आरोग्य चांगले राहावे. या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, असे डॉ.संजय रोडगे या वेळी म्हणाले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. शिबिराची माहिती गावागावात घरोघरी सर्व जनतेपर्यंत पोहचवून सर्व जनतेला या शिबिरामध्ये सहभागी करून घेण्यासाठी डॉ संजयदादा रोडगे मित्र मंडळातील सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या आरोग्य शिबिरात नवजात शिशुचे सर्व आजार, मेंदूज्वर, निमोनिया, मधुमेह, किडनीचे आजार, हृदयाचे गंभीर आजार, दमा फुफुस, आतड्यांची शस्त्रक्रिया, वंध्यत्व उपचार, जन्मतः पांगळेपणा, व्यंगत्व, मुतखड्यांच्या शस्त्रक्रिया, कॅन्सरचे उपचार, केमोथेरपी गर्भाशयाचे व स्तनांचे कॅन्सर हाडांचे सर्व ऑपरेशन अपघात व फ्रॅक्चर मणक्याच्या शस्त्रक्रिया मेंदूंच्या शस्त्रक्रिया लहान मुलांच्या शस्त्रक्रिया इत्यादी रोगांविषयी प्राथमिक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले तसेच गरजू व सर्व रुग्णांना औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. यासोबत रवळगाव सर्कल मधील सर्व नागरिकांना अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. या आरोग्य शिबिराचा लाभ ११५३ नागरिकांनी घेतला. प्रास्ताविक डॉ. अपूर्वा रोडगे (पारवे) यांनी केले. सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी केले, तर आभार भरत नाना रोडगे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संजीवनी हॉस्पिटल जालना येथील कर्मचारी, रवळगाव सर्कल मधील सर्व नागरिक व श्रीराम प्रतिष्ठानच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!