वाचन प्रेरणा : नूतन कन्या शाळेतील ग्रंथ प्रदर्शनाला प्रतिसाद
भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी
सेलू जि.परभणी : शहरातील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व स्व: सौ.दुर्गाताई द. कुलकर्णी स्मृती ग्रथांलयात भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, औरंगाबाद येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, अल्का कोरडे, मुख्याध्यापिका संगीता खराबे, दत्तराव घोगरे, रोहिदास मोगल यांची उपस्थिती होती.
अरुणा संगेवार म्हणाल्या, ” वाचनाने व्यक्तीचा आत्मविश्र्वास वाढतो. सर्वांगीण विकास होतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जीवनात सकात्मक बदल होण्यास मदत होते.” प्राचार्य कोठेकर म्हणाले, ” पुस्तके केवळ वाचू नयेत, तर ते प्रत्यक्षात आयुष्यात उतरावीत.” प्रारंभी प्रतिमा पूजन झाले. पूजा महाजन यांनी स्वागत गीत गायले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त “इवलेसे वेल वाचनाचे-वाढवू फुलू संस्काराचे” या उपक्रमात अग्निपंख या पुस्तकावर अतिशय सुंदर असे समीक्षात्माक विवेचन सादर केल्याबद्दल कोरडे यांनी प्रतीक्षा मोगल, उन्नती भोसीकर या विद्यार्थिनींचा रोख पाचशे रुपये पारितोषिक देऊन कौतुक केले. ग्रंथ खरेदीसाठी २५०० रुपये देणगी दिली. देणगीदार यादी वाचन कैलास मलवडे यांनी केले. प्रास्ताविक ग्रथंपाल शिवाजी शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वैशाली चव्हाण यांनी दिला. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले , तर आभार भालचंद्र गाजांपूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास देऊळगावकर, अनंत बोराडे आदींसह शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
औरंगाबाद येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे व अल्का कोरडे यांनी शाळेच्या स्व.सौ.दुर्गाताई कुलकर्णी स्मृती ग्रथांलयासाठी २५०० रुपयांची ग्रंथ भेट दिली. याबद्दल शाळेतर्फे कोरडे दाम्पत्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.