आंतरभारती : अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी, अमर हबीब कार्याध्यक्ष

आंतरभारती : अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी, अमर हबीब कार्याध्यक्ष

उपाध्यक्षपदी संगीता देशमुख, डॉ.डी.एस.कोरे सचिव 

पुणे : आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी, तर कार्याध्यक्षपदी आंबाजोगाईचे अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य सदाविजय आर्य यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आंतरभारतीच्या विश्वस्त मंडळाने पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय उपाध्यक्ष (महिला) संगीता देशमुख (वसमत), सचिव डॉ.डी.एस.कोरे (पुणे) व कोषाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी (सोलापूर) यांची निवड करण्यात आली. आंतरभारतीची स्थापना साने गुरुजी यांनी केली. ही संस्था राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करते. प्राचार्य सदाविजय आर्य या संस्थेचे अध्यक्ष होते. 17 सप्टेंबर 22 रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी हे शिक्षण क्षेत्रातील जाणकार असून, त्यांनी गोव्यामध्ये कथामालेचे कार्य केले आहे. 1975 पासून ते आंतरभारतीशी जोडले गेले आहेत. नूतन अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. या वेळी कार्याध्यक्ष अमर हबीब, संगीता देशमुख, डॉ.डी.एस.कोरे, डॉ.उमाकांत चनशेट्टी, प्रतापसिंह‌ डांगी यांच्यासह आंतरभारतीचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!