ACB TRAPPED : गाडीवाटसाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी; मंडळ अधिकारी, तलाठी जाळ्यात 

ACB TRAPPED : गाडीवाटसाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी; मंडळ अधिकारी, तलाठी जाळ्यात 

दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले 

परभणी : तक्रारदार यांच्या शेतात जाणे-येणेकरिता सव्वा आठ फूट  गाडी वाट रस्ता मोकळा करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना गंगाखेड येथील मंडळ अधिकारी व तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. सोमवारी (१७ ऑक्टोबर) सापळा रचून पथकाने ही कारवाई केली.

आरोपी लोकसेवकाची नावे याप्रमाणे : १) संजय लक्ष्मणराव काकडे (वय 56) व्यवसाय-नोकरी पद-मंडळ अधिकारी (वर्ग-3) नेमणूक-गंगाखेड, रा.मारोती नगर ता.सेलू,जि.परभणी. 2) रमेश दत्तराव भराड वय- 52 वर्ष, व्यवसाय- नोकरी, पद-तलाठी (वर्ग-3) नेमणूक-गंगाखेड, जि.परभणी.
या संदर्भात सोमवारी (१७ ऑक्टोबर) तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर पथकाने सापळा लावून कारवाई केली आहे. तक्रारदार यांच्या शेत गट 198 मध्ये जाणे येणे साठी गट क्र.198 व 200 मधून सव्वा आठ फूट गाडी वाट रस्ता देण्यासाठी तहसीलदार, गंगाखेड जि.परभणी यांनी १ जुलै २०२१ रोजी लेखी आदेश मंडळ अधिकारी, गंगाखेड व तलाठी, मालेवाडी, गंगाखेड यांना दिलेला होता. सदर रस्ता मोकळा करून देण्याच्या कामासाठी  तक्रारदार यांच्या गंगाखेड येथील दवाखानामध्ये दोन्ही आलोसे हजर असताना, दोन्ही आलोसे यांनी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून, लाचेची रक्कम 10,000 रूपये, यातील आलोसे क्रमांक 1 काकडे, मंडळ अधिकारी यांनी स्वतः आलोसे क्रमांक 2 भराड, तलाठी यांच्याकडे देण्यास सांगितले. यावरून आलोसे क्रमांक 2 भराड, तलाठी यांनी स्वतः 10,000 रुपये  स्वीकारले असता, आलोसे यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडले आहे. नमूद दोन्ही आलोसे यांच्याविरोधात गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण पर्यवेक्षण अधिकारी तथा परभणी विभागाचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, बसवेश्वर जकिकोरे,पोलीस हवालदार हनुमंते, कटारे, निलपत्रेवार , पोलिस शिपाई शेख मुक्तार, अतुल कदम चालक कदम यांचा पथकात समावेश होता.
परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा. डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड. मोबाईल नंबर  9623999944, किरण बिडवे, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि. परभणी. मोबाईल नंबर  7020224631, कार्यालय दूरध्वनी 02452-22059, टोल फ्री क्रमांक 1064

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!