अतिवृष्टीग्रस्त : शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; सेलूत साखळी उपोषणाला सुरुवात

अतिवृष्टीग्रस्त : शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; सेलूत साखळी उपोषणाला सुरुवात

निकष अटी व पंचनामे न करता, मदत जाहीर करा; तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा

सेलू जि.परभणी : ओला दुष्काळ जाहीर करावा,कुठलेही नियम व अटी न लावता सरसकट विमा जाहीर करावा. हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी या मागणीसाठी सेलू तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (१८ ऑक्टोबर) तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. काही दिवसापासून परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात सर्व मंडळात सर्व ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. आसमानी संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी शासनाने पीकविमा व ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १,००,००० रुपये मदत जाहीर करावी. ही मदत कोणतेही निकष अटी व पंचनामे न करता मदत जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. जो पर्यंत ही मदत शासन जाहीर करत नाही तोपर्यंत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. योगेश काकडे, अजय डासाळकर, विशाल देशमुख, ऋषीकेश सोळंके, सुरेश डासाळकर, दिनेश गाडेकर, विष्णू सोळंके आदींसह तीसहून अधिक जणांच्या निवेदनावर सह्या आहेत.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!