राजमाता अहिल्याबाई होळकर : पाथरीतील नवीन आठवडी बाजाराचे रविवारी लोकार्पण, जागा निश्चितीसाठी होणार लिलाव 

राजमाता अहिल्याबाई होळकर : पाथरीतील नवीन आठवडी बाजाराचे रविवारी लोकार्पण, जागा निश्चितीसाठी होणार लिलाव 

दत्तराव मायंदळे यांची माहिती : आमदार बाबाजानी दुर्राणी यांची उपस्थिती, आडत हॉलचे होणार उद्घाटन 

शेख अनवर 

पाथरी : पाथरी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर नवीन आठवडी बाजाराचे लोकार्पण व आडत हॉल उद्घाटन आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा रविवारी (२३ ऑक्टोबर) आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ओबीसी युवा नेते तथा राष्ट्रवादी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तराव मायंदळे यांनी दिली. 

कार्यक्रमास किरकोळ व ठोक विक्रेत्यांनी दि.२३ रविवार रोजी, नवीन आठवडी बाजार पाथरी येथे उपस्थित राहून बोली पद्धतीने आपली जागा निश्चित करावी. असे आव्हान मायंदळे यांनी केले आहे. सकाळी सात वाजता होणाऱ्या भाजी मंडई बिटची बोली उद्घाटन या वेळी होणार आहे. आमदार दुर्राणी नेहमीच तालुक्यातील व्यवसायिकांना केंद्रस्थानी ठेवून दूरदृष्टीने विचार करतात. सर्वांना सोयीचे होईल, अशा नवीन आठवडी बाजाराची संकल्पना त्यांनी मूर्त स्वरूपात आणली आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान सादेक बागवान, शेख अनिस बागवान, रज्जाक बागवान, सलाम बागवान, सय्यद शकील, हबीब , मजीद बागवान, रियाज बागवान, प्रभाकर धोतरे, रफिक बागवान, शेख मोहसीन, नवीद बागवान, असेफ बागवान आदींनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!