MSEB : सेलू,जिंतूर तालुक्यातील वीज प्रश्नांवरून अधीक्षक अभियंत्यांना धरले धारेवर; कामे मार्गी लावण्याची माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी

MSEB : सेलू,जिंतूर तालुक्यातील वीज प्रश्नांवरून अधीक्षक अभियंत्यांना धरले धारेवर; कामे मार्गी लावण्याची माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी

परभणी अधीक्षक अभियंता दालनात झाली बैठक 

परभणी : महावितरणच्या अक्षम्य दिरंगाई, दुर्लक्षामुळे सेलू – जिंतूर तालुक्यातील शहर व खेड्यापाड्यातील नागरिक, शेतकरी दैनंदिन वीज समस्या, प्रश्नांवरून त्रस्त झाले आहेत. कमी दाबाने वीज पुरवठ्यामुळे १४ गावातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. महावितरणने ग्रामीण भागातील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावीत. या साठी माजी आमदार विजय भांबळे यांनी शनिवारी (२२ ऑक्टोबर) अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली. कामांत होत असलेल्या दिरंगाईवरून अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

माजी आमदार विजय भांबळे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता चौधरी यांच्या सोबत त्यांच्या दालनात बैठक घेतली. गावामध्ये महावितरणतर्फे कुठेही केबल, किटकॅट देण्यात आले नाहीत. अनेक डीपीची दयनीय अवस्था आहे. जिंतूर-सेलू अंतर्गत वीजेची अवस्था दयनीय झाली असून, काही गावामध्ये गावठाण सप्लाय अजून सुद्धा पोहोचविण्यात आलेला नाही; तसेच सेलू तालुक्यातील कान्हड येथील सबस्टेशन ओव्हर लोड झाले असल्यामुळे, त्या परिसरातील शेतकरी यांना शेतीपंपासाठी कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे १४ गावातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या सबस्टेशनला अतिरिक्त ५ एम. व्ही.चा ट्रान्सफार्मर बसविल्यास शेतकर्‍यांना पाहिजे त्या प्रमाणात शेतीपंपासाठी वीज पुरवठा होऊ शकतो. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. कान्हड, कुपटा, भांगापूर, सिमनगाव, गव्हा, तांदुळवाडी, गुळखंड, हट्टा, आडगाव दराडे, सेलवाडी, गायके पिंपळगाव , मारवाडी, टाकळी नीलवर्ण, मंगरूळ, निरवाडी लिपणे येथे गावठाण फिडरवर १०० के.व्ही. ट्रान्सफार्मर मंजूर करणे. मोरेगाव येथे गावठाण फिडरवर १०० के.व्ही. ट्रान्सफार्मर मंजूर करणे, जवळा जिवाजी येथे गावठाण फिडरवर १०० के.व्ही.चे ट्रान्सफार्मर मंजूर करणे. नरसापूर गावठाण फिडरवर १०० के.व्ही.चा ट्रान्सफार्मर मंजूर करणे, वाई बोथ येथे गावठाण फिडरवर १०० के.व्ही.चा ट्रान्सफार्मर मंजूर करणे. वालूर सबस्टेशन अंतर्गत हातनूर येथे ए.जी.फिडरवर रात्रीचे सिंगल फेज सुरु करणे. २०१८ च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कोटेशन भरले आहे. त्या शेतकर्‍यांची कामे अद्यापपर्यंत सुरु नाहीत. ती कामे तात्काळ सुरु करण्यात यावी; तसेच जिंतूर शहराचा पाणीपुरवठा अनेक दिवसापासून एम.एस.ई.बी.विद्युत पुरवठ्यामुळे सुरळीत होत नाही. नेहमी बंद पडत आहे. जिंतूर शहराच्या पाणीपुरवठा वीज कनेक्शन हायड्रोमधून देण्यात यावा. जिंतूर शहरात दोन फिडर आहेत नेमगिरी व हुतात्मा स्मारक ह्या दोन्ही फिडरवर सारखी लाईट राहत नाही. दोन्ही फिडरचे मेंटेनन्स करून दोन्ही फिडरची लाईट तात्काळ सुरळीत करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन यावेळी अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले. कामे तात्काळ मार्गी लावू, असे आश्वासन अधीक्षक अभियंता यांनी दिले. यावेळी मनोज राऊत, सुधाकर रोकडे, रवी देशमुख, माऊली घुगे, तोडकर, चंद्रकांत गाडेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!