CRIME : कटरच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; सेलूत भरस्त्यावर घडली घटना
आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात
परभणी : पैशाच्या कारणावरून झालेल्या आपापसातील वाद, हाणामारीत एकाने दुसर्याच्या गळ्यावर धारदार कटरने हल्ला केला. उपचारासाठी नेतांना वाटेतच जखमीचा तरुणाचा मृत्यू झाला.सेलू (जि.परभणी) शहरात भरस्त्यावर ही घटना घडली. संतोष किशन आवटे (वय ३५, गोंधळी गल्ली, सेलू ) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी साडेअकरा-बाराच्या सुमारास घडी टॉवरजवळ हेमंत गोविंद गंडले (वय ४५, रा.शाहूनगर, सेलू ) व संतोष आवटे या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला. हाणामारीत हेमंतने, संतोषच्या गळ्यावर धारदार कटरने हल्ला केला. गळा चिरल्याने संतोष गंभीर जखमी झाला. सेलू उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून जखमी संतोषला परभणीला उपचारासाठी नेतांना, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी हेमंत गंडले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, संजय चव्हाण, जमादार शेख उस्मान यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.