दिवाळी : चारठाणा ठाण्याच्यावतीने पोलिस पाटलांना मिठाईचे वाटप

दिवाळी : चारठाणा ठाण्याच्यावतीने पोलिस पाटलांना मिठाईचे वाटप

परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्याच्यावतीने दिवाळीनिमित्त शनिवारी (22 ऑक्टोबर) पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्षेत्रातील पोलिस पाटलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.  यावेळी सहायक पोलिस निरीक्षक साने, आचार्य, मनोज झाडे, कालवणे, गरुड ,कोंडरे यांची उपस्थिती होती. पोलीस अधिकारी यांनी केलेल्या आवाहनास चारठाणा परिसरातील विविध गावांचे पोलिस पाटील उत्तम प्रतिसाद देतात, असे सांगून गायकवाड यांनी पोलिस पाटलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!