राष्ट्रवादी काँग्रेस : बामणी येथील तरुणांचा विजय भांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
जिंतूर : मौजे बामणी येथील तरुणांनी माजी आमदार विजय भांबळे यांच्या कार्यास प्रेरित होऊन व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवारी, २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. राम देशमुख, गजानन देशमुख, गोविंद देशमुख, लक्ष्मण डोईफोडे, आकाश नेवाड, तुकाराम देशमुख, उमेश देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, प्रदीप पांनगे, संदीप गोरे, भांदास पांनगे, किशोर थळकरी आदींचा यामध्ये समावेश आहे. भांबळे यांनी कार्यकर्त्यांचे गळ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा रुमाल घालून पक्षामध्ये स्वागत केले. या वेळी दिलीप डोईफोडे, प्रकाश आप्पा थळकरी, राजू तायडे, प्रकाश लांडगे आदींची उपस्थिती होती.