स्नेहमेळावा : सेलूतील ‘नूतन’ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

स्नेहमेळावा : सेलूतील ‘नूतन’ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा दिवाळीनिमित्त उपक्रम : माजी विद्यार्थ्यांनी दिला शालेय जीवनातील आठवणींना उजाळा, बंदिस्त प्रेक्षागृह बांधकामाची केली पाहणी

स्नेहमेळावा : सेलूतील 'नूतन' च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त मंगळवारी (ता.२५) आयोजित माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शालेय, महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, संस्था परिसरात उभारण्यात येत असलेल्या बंदिस्त प्रेक्षागृह (Indoor Sports Hall) बांधकामाचीही विद्यार्थ्यांनी पाहणी करून आनंद व्यक्त केला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. या वेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.वसंत पांचाळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या क्रीडा सुविधा योजनेअंतर्गत संस्थेच्या परिसरात सुमारे दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या बंदिस्त प्रेक्षागृहाचे (Indoor Sports Hall) बांधकाम प्रगतीपथावर आहे, असे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांनी यावेळी सांगितले. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त तालुकास्तरावरील सर्वात आदर्श असे हे प्रेक्षागृह असणार आहे. निधीची कमतरता आहे. पंरतु; सर्वांचे भरीव योगदान मिळत आहे. काम पूर्णत्वास नेण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन श्री बिहाणी यांनी केले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे विद्यार्थी कुठेही असो, कोणत्याही क्षेत्रात असो. वाया जात नाहीत. जिथे असतील तिथे सर्वोत्तम देण्यासाठीचा ते प्रयत्न करतात. आम्हालाही याच संस्थेने घडवले; मोठे केले आहे, असे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी या वेळी नमूद केले व सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी आश्वस्त केले. प्रेक्षागृह बहुउद्देशीय असून खेळाडूंना तसेच नागरिकांना याचा फायदा होणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेसाठी उपयुक्त ठरणार आहे. उर्वरित निधी शासनाकडून लवकर मिळावा यासाठी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, विनोद बोराडे आदींच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत, असे पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर यांनी सांगितले. माजी विद्यार्थी संतोष चिद्रवार, अनुज लोडाया, डॉ.आशीष मेहता, प्रिया पैठणे-कदम, ॲड.गोविंद शेळके, गणेश सुरवसे आदींनी मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. डॉ.एस.एम.लोया यांनी अध्यक्षीय समारोप केला. मेळाव्याला बाहेरगावाहून आलेल्या; तसेच शहरातील माजी विद्यार्थ्यांचे डॉ.लोया यांनी स्वागत केले.

या वेळी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त सृष्टी चिद्रवार या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला. सच्चिदानंद डाखोरे, प्रणव व निषाद जोग यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर, तर गणेश माळवे यांनी आभार मानले. मेळाव्याला संस्था कार्यकारी मंडळाचे सदस्य, बाहेरगावाहून आलेले तसेच शहरातील माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व शिक्षणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक गिरीश लोडाया, गणेश माळवे, प्राचार्य डॉ.एम.एस.शिंदे,  एन.पी पाटील, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संगीता खराबे, सुखानंद बेंडसुरे, प्रा.संजय पिंपळगांवकर, प्रा.अशोक आकात बन्सीलाल पद्मावत, सुनील तोडकर, अशोक लिंबेकर, भालचंद्र गाजांपुरकर, बाबासाहेब हेलसकर,  दयानंद जामगे, प्रा.नागेश कान्हेकर सुरेखा रामदासी, रोहिदास.मोगल,, बी.के.थोरे, अनिल रत्नपारखी, उल्हास पांडे, एकनाथ जाधव, सतिश नावाडे, रवि गिरी, विजेंद्र धापसे, गजानन मुळी, अरुण रामपूरकर, केशव डहाळे आदींसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

माजी विद्यार्थ्यांचे भरीव योगदान

नूतन विद्यालय शिक्षण संसस्थेच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या  बंदिस्त प्रेक्षागृहाच्या कामाला अधिक गती मिळावी, यासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी तथा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, डॉ.आशीष मेहता व संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांनी प्रत्येकी एक लाख रूपये, अनुज गिरीश लोडाया यांनी पंचवीस हजार रुपये, तर अमृत विनायकराव कोठेकर व गणेश सुरवसे यांनी प्रत्येकी एकवीस हजार रुपयांची देणगी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जाहीर केली.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!