अभीष्टचिंतन सोहळा : सेलू पालिकेवर भगवा हीच भेट : माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर 

अभीष्टचिंतन सोहळा : सेलू पालिकेवर भगवा हीच भेट : माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर 

माजी सभापती रवींद्र डासाळकर मित्र मंडळातर्फे बोर्डीकर यांचा सेलूत सत्कार, पुरूषोत्तम महाराजांचे कीर्तन, नागरिकांची मोठी उपस्थिती 

सेलू जि.परभणी : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या वेळी सत्काराला उत्तर देताना बोर्डीकर म्हणाले, ” आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत भरघोस यश देऊन, पालिकेवर भगवा फडकवला तर, तीच माझ्या वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल.”

सेलू बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र डासाळकर व मित्रमंडळाने शुक्रवारी, 28 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील, आमदार मेघना बोर्डीकर यांनी मनोगत व्यक्त केले. मीनाताई बोर्डीकर, रवींद्र डासाळकर, ॲड.रामेश्वर शेवाळे, अर्जुन बोरुळ, कपिल फुलारी, मयुर वाघ, विठ्ठल कोकर, बाळू काजळे, नितीन आजबे, दीपक चव्हाण आदींची उपस्थिती होती.

माजी आमदार बोर्डीकर म्हणाले, ” माझ्यावर आज पर्यंत सर्वांनी भरभरून प्रेम केले आहे. वाढदिवसानिमित्त कीर्तनाचे आयोजन करून माझा मोठा गौरव केला आहे. हेच प्रेम कायम ठेवून आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत भरघोस यश देऊन, पालिकेवर भगवा फडकवला तर, तीच माझ्या वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल.” आमदार मेघना बोर्डीकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी विविध सामाजिक, सेवाभावी संस्थेच्या वतीने माजी आमदार बोर्डीकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुभाष मोहोकरे यांनी केले. यानिमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाला महिला पुरुष नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रत्येकाला जीवनामध्ये संगत कोणाची करावी हे कळलं पाहिजे, साधुसंतांच्या सहवासात रेडा, भिंत यांचादेखील उद्धार होतो. मृत व्यक्ती जिवंत होतात. त्यामुळे प्रत्येकाने देवावर प्रेम केले पाहिजे. साधुसंतांच्या संगतीत राहिले, तर जीवनात कशाचीही कमी पडणार नाही. जीवनामध्ये संगत खूप महत्त्वाची आहे, असे पुरुषोत्तम महाराज  पाटील यांनी यावेळी कीर्तनातून सांगितले.  

अभीष्टचिंतन सोहळा : सेलू पालिकेवर भगवा हीच भेट : माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर 

 

हेही वाचा : सेलूतील ‘श्रीकेशवराजां’साठी’ मुख्यमंत्री सत्वर धावले…

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!