शरदचंद्र पवार : उपचारासाठी ब्रीच कॅन्डीमध्ये; बुधवारी डिस्चार्ज

शरदचंद्र पवार : उपचारासाठी ब्रीच कॅन्डीमध्ये; बुधवारी डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिर्डीतील शिबिरासाठी उपस्थित राहणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी सोमवारी, ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व ३ नोव्हेंबर २०२२ रोजी, पवार शिर्डी येथे पक्षाच्या ४ व ५ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

शरदचंद्र पवार : उपचारासाठी ब्रीच कॅन्डीमध्ये; बुधवारी डिस्चार्ज

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!