CM Eknath Shinde : सेलूतील ‘श्रीकेशवराजां’साठी मुख्यमंत्री सत्वर धावले…

CM Eknath Shinde : सेलूतील ‘श्रीकेशवराजां’साठी मुख्यमंत्री सत्वर धावले…

श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज संस्थानच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन कोटींच्या निधीची मागणी, माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचे निवेदन 

CM Eknath Shinde : सेलूतील 'श्रीकेशवराजां'साठी मुख्यमंत्री सत्वर धावले...

Authored By Babasaheb Helaskar 

सेलू जि.परभणी : संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलू (जि.परभणी) शहराचे ग्रामदैवत श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज संस्थानच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी सायंकाळी साकडे घालण्यात आले; अन् ‘श्रीकेशवराजां’ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्वर धाव घेत, प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी तात्काळ पर्यटन सचिवांना दिले. 

यासंदर्भात माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी शनिवारी, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांची प्रतिमा भेट दिली. श्रीकेशवराज बाबासाहेब संस्थानला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यात्रा महोत्सवाला दोनशे वर्षाची परंपरा आहे. यानिमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविक भक्तांच्या सुविधेसाठी मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम करणे, भक्तनिवास बांधकाम, पायाभूत सुविधा; तसेच रस्त्याची कामे करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची अत्यंत आवश्यकता आहे. या तीर्थ क्षेत्रा‌च्या विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करावा.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संदीप लहाने यांनी संस्थानच्या विकासा संदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी मागणीची दखल घेत, ‘अ’दर्जा तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पर्यटन सचिवाला दिले आहेत. यावेळी संदीप लहाने, बंडू देवधर, अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, परमेश्वर राऊत आदींची उपस्थिती होती.

श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थानमध्ये भाविक भक्तांच्या सुविधेसाठी मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम करणे, भक्तनिवास बांधकाम, पायाभूत सुविधा; तसेच रस्त्याची कामे करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची अत्यंत आवश्यकता आहे. या तीर्थक्षेत्रा‌च्या विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करावा. अशी मागणी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याची तात्काळ दखल घेत, पर्यटन सचिवांना अ दर्जा तीर्थक्षेत्र अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

CM Eknath Shinde : सेलूतील 'श्रीकेशवराजां'साठी मुख्यमंत्री सत्वर धावले...

हेही वाचा : सेलू पालिकेवर भगवा हीच भेट : माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर 

हेही वाचा : श्री केशवराज बाबासाहेब मंदिरासाठी दोन कोटी ! 

हेही वाचा : सेलूतील ‘ती’ जागा श्रीशंकरलिंग मंदिराचीच ! 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!