कीर्तन : सिद्धनाथ बोरगाव येथे लक्ष्मण महाराज आळंदीकर यांचे आज कीर्तन; ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

कीर्तन : सिद्धनाथ बोरगाव येथे लक्ष्मण महाराज आळंदीकर यांचे आज कीर्तन; ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

डॉ.रामराव रोडगे यांचा अभीष्टचिंतन सोहळा : जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आमदार बाबाजानी दुर्राणी, विजय भांबळे यांची उपस्थिती

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक, मार्गदर्शक रामराव रोडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सिद्धनाथ बोरगाव येथील श्री महादेव मंदिर परिसरात रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता, प्रसिद्ध कीर्तनकार लक्ष्मण महाराज आळंदीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे
या वेळी विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, शासकीय कंत्राटदार आर.बी.घोडके जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोक काकडे, श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक रामराव रोडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिम जिल्हा पक्षनिरीक्षक डॉ. संजय रोडगे, मराठवाडा प्रचार प्रमुख सारंगधर महाराज, शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप लहाने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, परिसरातील नागरिक, श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळ व सिद्धनाथ बोरगावच्या ग्रामस्थांनी केले आहे.

हेही वाचा : मोबाईल चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, दोघे गजाआड 

हेही वाचा : भारत जोडो यात्रा : मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन 

हेही वाचा : श्री नागनाथ मंदिर : शेकडो दिव्यांनी उजळला हातनूरचा बारव परिसर 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!