LIC : सेलूतील एलआयसी कार्यालयाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात

LIC : सेलूतील एलआयसी कार्यालयाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात

भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत “सत्यनिष्ठा शपथ ” घेत सप्ताहाला प्रारंभ 

सेलू जि.परभणी : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहाला सोमवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली.सहा नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शाखा प्रबंधक संतोष कोडगिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी अकरा वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत “सत्यनिष्ठा शपथ” देण्यात आली.

” आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक प्रमुख अडसर आहे, असे मला वाटते भ्रष्टाचार निर्मूलना साठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटित पणे काम करावे असे मला वाटते, प्रत्येक नागरिकाने सदैव सचोटी व एकात्मता या तत्वांच्या पूर्ततेसाठी सतर्क व कटिबद्ध रहाण्याची दक्षता घ्यायला हवी, तसेच भ्रष्टाचारा विरूद्ध लढा देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी प्रतिज्ञा करतो की, मी जीवनात नेहमी सच्चेपणा आणि कायदूयाने पालन करीन, कधी ही लाच देणार आणि घेणार नाही, सर्व कामे प्रामाणिक पणाने आणि पारदर्शक पद्धतीने करीन, लोक हिताच्या दृष्टीने काम करीन, वैयक्तिक वर्तणुकीतून एकात्मतेचे उदाहरण दाखवून देईन, संबंधित संस्थांना भ्रष्टाचाराची घटना लक्षात आणून देईन.” अशी शपथ घेऊन सप्ताहास सुरूवात करण्यात आली.

या वेळी भूषण बक्षी, रामचंद्र साखरे, अविनाश जोशी, सुनील वाकडे, शमशोदीन शेख, अजय पुंडलिक, गोपाळ गाडगे, अनिल यादव, शिवाजी अघाव, सुभाष दाभडकर, जाकेर शेख, शिवाजी अघाव,अरूण चाटे, शुभम जोशी, अमोल जाधव, सुबोध पांडे, भालचंद्र बर्डे, अरूण साळवे, शंकर जिवने, गजानन वाकडीकर,शेख आमिर, नितीन भिसे, गोविंद कारके आदींसह अधिकारी, कर्मचारी, विमा प्रतिनिधींची उपस्थिती होती.

हेही वाचा : ज्येष्ठांचा सन्मान : सिद्धनाथ बोरगाव येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार

हेही वाचा  : सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांची देशाला गरज : एस.डी.ओ.अरुणा संगेवार 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!