राष्ट्रवादीचा इशारा : ‘त्या’ न्यूज चॅनलवाल्याला धडा शिकवा; अन्यथा… 

राष्ट्रवादीचा इशारा : ‘त्या’ न्यूज चॅनलवाल्याला धडा शिकवा; अन्यथा… 

पाथरीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांची खोटी बातमी चालवल्याचे प्रकरण, तहसील कार्यालयासमोर आंदोलन

अन्वर शेख…

पाथरी : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अर्धवट माहितीच्या आधारे नाहक बदनामी करणारी खोटी बातमी चालविणाऱ्या ‘त्या’ न्यूज चॅनलवाल्याला कायदेशीर धडा शिकवा; अन्यथा ‘लोकशाही’ मार्गाने हिसका दाखवू, असा इशारा पाथरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, खोटी बातमी चालवल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी येथे पत्रकार परिषद घेत प्रखर बाजू मांडली. पाथरी नगरपरिषद कर्मचाऱ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करणार्‍यांविरोधात सोमवारी, ३१ ऑक्टोबरपासून संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. पाथरी राष्ट्रवादी आणि युवक राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार सुमन मोरे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदनाद्वारे कार्यवाही करण्याची मागणी करत, नाहक बदनामी करणाऱ्या न्यूज चॅनलवाल्याविरोधात ‘लोकशाही’ मार्गाने आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी नगरपरिषद कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. दिलेल्या अधिकारांचा गैर उपयोग करून खोटी माहिती आणि चलचित्र प्रसारीत करून दिवसभर चरित्र हणन करणाऱ्या ‘त्या’ न्यूज चॅनलवाल्याला कायद्याच्या मार्गाने धडा शिकवावा. अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. कायदेशीर कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

======

पाथरी नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नाहकपणे व जाणून बुजून खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आज पासून सुरू झालेल्या बेमुदत काम बंद आंदोलनास न्याय मिळत नाही तोपर्यंत नगरपालिका प्रमुख म्हणून मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे.

– कोमल सावरे, मुख्याधिकारी

 पाथरी

======

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर बिनबुडाचे खोटे आरोप लावून प्रसिद्धीसाठी हापापलेला लोकशाही न्यूज आमच्या नेत्याची प्रतिमा मलीन करत आहे. याचा जाहीर निषेध करून, शासनाने सदरील चैनलवर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा लोकशाही न्यूज ला लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी पार्टीचा हिसका दाखवू याचे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्यावतीने सर्वांच्या उपस्थितीत आम्ही लेखी निवेदन देत आहोत

– अलोक चौधरी, माजी सभापती न.प.पाथरी

 

हेही वाचा : जबरदस्त व्हायरल : सेलूतील हा संदेश होतोय‌ सध्या…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!