सेलू एमआयडीसी : इतरत्र जाऊच देणार नाही; मुख्यमंत्र्यांशी उद्या तातडीने चर्चा : माजी आमदार हरिभाऊ लहाने 

सेलू एमआयडीसी : इतरत्र जाऊच देणार नाही; मुख्यमंत्र्यांशी उद्या तातडीने चर्चा : माजी आमदार हरिभाऊ लहाने

शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न, माजी आमदार लहाने यांची माहिती 

सेलू एमआयडीसी : कुठेही जाऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांशी उद्या तातडीने चर्चा : माजी आमदार हरिभाऊ लहाने 

सेलू जि.परभणी : एमआयडीसी चा प्रकल्प हा सेलू तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ करणारा असेल; तसेच हादगाव पावडे परिसरातील जागा ही सर्व दृष्टीने अनकूल आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र कुठेही जाऊच देणार नाही. या बाबतीत आपण तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी भेटून सविस्तर माहिती देणार आहे, असे माजी हरिभाऊ लहाने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे.

या प्रकल्पातील भूसंपादनासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करू. शेतकरी बांधवाशी चर्चा करून त्यांना अपेक्षित मोबदला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कुठल्याही शेतकरी बांधवावर अन्याय होणार नाही, तर सामोपचारानेच हा प्रश्न मार्गी लावू असेही त्याने सांगितले.

सेलू एमआयडीसी करिता हादगाव पावडे 95.85 हेक्टर, रवळगाव 212.35 हेक्टर, प्रिंपुळा 28.61 हेक्टर असा 245.81 हेक्टर जमिनीवर एमआयडीसीला शासनाची यापूर्वी मंजुरी मिळाली आहे. असा हा महत्वकांक्षी प्रकल्प सेलू तालुका व परिसरासाठी वरदान ठरणार असून, आपण उद्या या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहोत, असे लहाने यांनी म्हटले आहे. दरम्यान, रविवारी (६ नोव्हेंबर) सकाळी लहाने यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी लागणार्‍या शेतजमीन धारक काही शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हेही वाचा : सेलूतील एमआयडीसी : इतरत्र हलविण्याच्या हालचालींना वेग ?

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!