हर हर महादेव : संभाजी ब्रिगेडच्या इशार्‍यानंतर सेलूत चित्रपटाचे प्रदर्शन रोखले

हर हर महादेव : संभाजी ब्रिगेडच्या इशार्‍यानंतर सेलूत चित्रपटाचे प्रदर्शन रोखले

शिवछत्रपतींच्या इतिहासाची बदनामी केल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप

सेलू जि.परभणी : मराठ्यांच्या इतिहासाची मोडतोड करुन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची बदनामी करणारा “हर हर महादेव” या चित्रपटाचे प्रदर्शन संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे यांच्या इशाऱ्यानंतर बंद करण्यात आले.
शहरातील मुक्ता ए टु मिनाक्षी चित्रपटगृहात सुरू असलेल्या हर हर महादेव या मराठी चित्रपटाचे आज आठ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून प्रदर्शन बंद करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून मराठा समाज व शिवप्रेमी बांधवांची तीव्र नाराजी व संताप व्यक्त केल्यानंतर समाज भावनांचा आदर करत चित्रपटगृह संचालकांनी तात्काळ प्रदर्शन बंद करत यापुढे वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित न करण्याचा कळवले आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!