गुरुनानक जंयती : सेलूतील गुरुद्वारात उत्साहात साजरी 

गुरुनानक जंयती : सेलूतील गुरुद्वारात उत्साहात साजरी 

विविध कार्यक्रम, सर्व धर्मीय बांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभगुरुनानक जंयती : सेलूतील गुरुद्वारात उत्साहात साजरी सेलू : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांची ५५३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने येथील रेल्वे स्टेशन रोडवरील गुरुद्वारात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसर रोषणाईने उजळून निघाला. मंगळवारी, ८ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सात दिवसांच्या सप्ताहानिमित्त नांदेड येथील ग्यानी नितीश सिंग महाराज यांच्या उपस्थितीत पाठ झाले. मंगळवारी सेलू शहरातील शीख बांधवांतर्फे आयोजित लंगर महाप्रसादाने सांगता झाली. सर्व धर्मीय बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. राम कुकरेजा, जितसिंग अरोरा, पंकज, बजाज, बंट्टी बजाज, अमरबिर सिंग बब्बर, रोनीत सिंग, बब्बर, तरनसिंग बजाज, दिलजीत अरोरा, सत्यम चचेडीया, रजत कुंदनानी, मनोज कांचन, गौरव कुंदनानी, वंश गुरबानी, परमप्रीत कौर बजाज, रेणू कौर अरोरा, अमृता कौर बब्बर, प्रीती अरोरा, रविंद्र कौर बब्बर, नेहा बजाज, जगदिश कौर, प्रमोद सांगतानी, सावित्री जाधवानी, कीर्ती कुकरेजा, शेख अयाज, बालाजी शेडुते आदींसह शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!