होम मिनिस्टर : जिंतूरात महिलांचा विक्रमी प्रतिसाद; प्राजक्ता माळी यांची उपस्थिती

होम मिनिस्टर : जिंतूरात महिलांचा विक्रमी प्रतिसाद; प्राजक्ता माळी यांची उपस्थिती

दीपावली स्नेहमिलननिमित्त श्रीनृसिंह प्रतिष्ठानचा उपक्रम, विजेत्यांना पारितोषिक, 25 महिलांना मानाची पैठणी

जिंतूर : येथील श्रीनृसिंह प्रतिष्ठान आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त हास्यजत्रा फेम, महाराष्ट्राची लोकप्रिय सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी , 10 नोव्हेंबर रोजी चिंतामणी पार्कमध्ये झालेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. या मध्ये जयश्री मसुरे यांनी प्रथम, राधाबाई सडाळ व्दितीय, तर कमलबाई रोकडे तृतीय पारितोषिक मिळविले.

मागील ८ वर्षांपासून जिंतूर मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आजोजन करण्यात येत आहे. यंदा जिंतूर शहरात प्रथमच माता-भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला. प्रथमच घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथमच महिलांचा हा सोहळा ऐतिहासिक ठरला. प्रथम पारितोषिक (फ्रिज) विजेत्या ठरल्या जयश्री मसुरे तर द्वितीय (वाशिंग मशीन)  राधाबाई सडाळ व तृतीय(पिठाची गिरणी कमलबाई रोकडे या ठरल्या. यासह २१ विजेत्या महिलांना मानाची पैठणी देण्यात आली. प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला बहार आली. त्यांनी सर्वांशी संवाद साधला व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी माझ्या माहेरी आल्या सारखे वाटत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रेक्षाताई भांबळे म्हणाल्या, “ आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा माझ्या सारख्या छोट्या भगिनीच्या पाठीशी आहे. म्हणून आज हा कार्यक्रम मी यशस्वी पार पाडू शकले.” उद्धव केपी यांनी रंगतदार सूत्रसंचालन केल. श्रीनृसिंह प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रेक्षाताई भांबळे आभार मानले. दरम्यान, 9 नोव्हेंबर रोजी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा दीपावली निमित्त स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हिंदू धर्मातील वारकरी, बौद्ध धर्मातील भंते व मुस्लीम धर्माचे धर्मगुरु मौलाना यांचा भांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृ.ऊ.बा.समिती संचालक, नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!