MIDC SELU : भूसंपादनावरील चर्चा तुर्तास लांबणीवर, शुक्रवारची बैठक रद्द

MIDC SELU : भूसंपादनावरील चर्चा तुर्तास लांबणीवर, शुक्रवारची बैठक रद्द

रवळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने तुर्तास केली बैठक रद्द, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांची माहिती 

सेलू जि.परभणी : सेलू औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादन अनुषंगाने‌ जिल्हाधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली मौ.हादगाव खुर्द, रवळगाव व पिंप्राळा येथील जमीन संपादन होणाऱ्या खातेदार यांची दिनांक ११.११.२०२२, शुक्रवार रोजी दुपारी १२.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. ती रद्द करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी गुरुवारी, १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. यामुळे भूसंपादनावरील सकारात्मक होऊ घातलेली चर्चाही तुर्तास लांबणीवर पडली आहे.

सेलू औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादन अनुषंगाने‌ जिल्हाधिकारी परभणी यांचे अध्यक्षतेखाली मौ.हादगाव खुर्द, रवळगाव व पिंप्राळा येथील जमीन संपादन होणाऱ्या खातेदार यांची दिनांक ११.११.२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. तथापि राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ०९.११.२०२२ रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२२ घोषीत केल्यामुळे; तसेच सदर निवडणूक कार्यक्रमात रवळगाव ग्रामपंचायतचा समावेश असल्यामुळे तुर्तास सदर बैठक ही रद्द करण्यात आली आहे. बैठकीची पुढील तारीख स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. याची सर्व खातेदार व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे सेलूच्या उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित बातमी : MIDC : सेलूतील एमआयडीसी, टेक्सटाईल पार्कला गती द्या; कृती समितीची मागणी

संबंधित बातमी : सेलूतील एमआयडीसी : इतरत्र हलविण्याच्या हालचालींना वेग ?

संबंधित बातमी : सेलूतील ‘एमआयडीसी व टेक्स्टाईल पार्क’ला तत्वतः मंजुरी ; आमदार मेघना साकोरे बोर्डीकरांची माहिती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!