लक्ष्मण बागल यांचा सेलूत सत्कार
परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी झाली निवड
परभणी : अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सेलू (जि.परभणी) तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांची निवड करण्यात आली. याबद्दल सेलू पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे, प्रवीण देशपांडे यांच्या उपस्थित परभणीत नुकतीच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये लक्ष्मण बागल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल सेलू येथे सत्कार करण्यात आला. या वेळी पत्रकार संघाचे मोहसीन अहमद, निसार पठाण, मोहमद इलियास, कांचन कोरडे, नारायण पाटील, दिलीप मोरे, अबरार बेग, संजय मुंढे, राधाकिशन कदम, खपले राहुल, संतोष गरड, दिलीप डासाळकर आदींसह पत्रकारांची उपस्थिती होती.