बालदिन : क्रांती फाउंडेशनकडून खाऊ वाटप, विवेकानंद शाळेत कार्यक्रम
पंडित नेहरू, क्रांतीवीर लहुजी साळवे यांना अभिवादन
सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात क्रांती फाउंडेशनच्या वतीने बालदिनाचे (१४ नोव्हेंबर ) औचित्य साधत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. प्रारंभी पंडित नेहरू व लहुजी साळवे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्षा पौर्णिमा जोहीरे, उपाध्यक्षा छाया पाचलेगावकर सदस्या दिपीका पवार, सुवर्णा कांबळे, शुभांगी सांगुळे, कांचन हिवाळे यांची उपस्थिती होती. विद्यालयातील शिक्षिका रागिणी जकाते यांनी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन विजय चौधरी, आभार गजानन साळवे यांनी मानले.