बालदिन : बालहक्क रॅली; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची उपस्थिती
बालगृह, कस्तुरबा गांधी विद्यालयाचा सहभाग
परभणी : बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान बाल हक्क रॅलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. बालगृहातील मुले व कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, चाईल्ड लाईन व बाल कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव लांडगे यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी चाईल्ड लाईनच्या “दोस्ती सप्ताहाचे” उद्घाटन केले व बालकांशी त्यांच्या लहानपणीचे मजेशीर अनुभव कथन केले. “बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा” घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरुड, अधीक्षक श्री.अंधारे, बाल कल्याण समिती अध्यक्ष श्री.कात्नेश्वर, सदस्य श्रीमती काळवीट, श्री.चव्हाण, श्री.मेश्राम, श्री.भुजबळ, चाईल्ड लाईन जिल्हा प्रतिनिधी संदीप बेंडसुरे, सदस्य इशरत व जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.