उल्लेखनीय : गिर्यारोहकांची उत्तराखंडमधील मोहिम यशस्वी; परभणीतील ५० जणांचा सहभाग

उल्लेखनीय : गिर्यारोहकांची उत्तराखंडमधील मोहिम यशस्वी; परभणीतील ५० जणांचा सहभाग

मोहिमेतून दिला सामाजिक एकात्मतेसह निसर्गसंवर्धन, स्वच्छतेचा संदेश

परभणी : एक नोव्हेबर रोजी रवाना झालेल्या गिर्यारोहकांनी उत्तराखंडमधील गोमुख-तपोवन व दयारा बुग्याल या दोन मोहिमा सामाजिक एकात्मतेचा, निसर्गसंवर्धन व स्वच्छतेचा संदेश देत यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
गंगोत्री ते भोजबासा पायी चालत तिथे उणे-दोन सेल्सीअस अशा शरीर गोठवणार्‍या तापमानात दोन मुक्काम करत 14 हजार 630 फूट उंच असलेल्या गंगानदीचा उगम बघून व गोमुख- तपोवनचे दर्शन केले. याठिकाणी सर्वांनी बर्फवृष्टीचाही आनंद घेतला.जिल्हा उत्तरकाशी नजीक 11 हजार 940 उंचीवर असलेल्या दयारा बुग्यालची सुंदर वनसंपदा, मनमोहक निसर्ग व शिखरमाथ्यावरून दिसणारी हिमशिखरे बघून सर्वांनी डोळ्याची पारणे फिटल्याचा व प्रसन्नतेचा अनुभव घेतला.
परभणी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे तब्बल 50 कर्तबगार गिर्यारोहणप्रेमींनी ‘भारतमाता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘वंदे मातरम’, ‘निसर्गसंवर्धन करू’, ‘सृष्टी वाचवू, पृथ्वी सुंदर ठेवू’, ‘हम सब एक है’ अशा घोषणा देत मोहिमेचा आनंद घेतला. ॠषिकेश येथील प्रसिद्ध रिवर राफटींग करून ही मोहीम आटोपली.
परभणीतील अस्थिरोग तज्ञ डॉ. केदार खटिंग यांची शिस्त व मार्गदर्शन, दिल्लीचे गिर्यारोहक राहूल शर्मा, परभणीचे गिर्यारोहक रणजित कारेगावकर यांचा पुढाकार व सुरेख समन्वय तसेच स्वराज ट्रेकर्सचे राजेश्वर गरुड यांच्या परिपूर्ण नियोजनाने ही मोहीम व्यवस्थित पार पडली.
परभणी शहराच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रितपणे ट्रेकिंगला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. यामध्ये डॉ.चंद्रशेखर भालेराव, डाॅ.गजानन मार्डीकर, डॉ.संदीप कार्ले, डॉ.शिवराज टेंगसे, डॉ. जगदीश नाईक, विठ्ठल शिसोदिया, ओम तलरेजा, सनत जैन, प्रा.डॉ. जयंत बोबडे, बालाजी सुर्वे, विष्णू मेहत्रे, अतुल शेळके, डॉ. सचिन देशमुख, रामप्रसाद सोळंके, सचिन माळवदकर, दीपक चव्हाण, सुधीर देशमुख, विकास वाराळ, विलास वाराळ, डॉ.भारत देवसरकर, ज्ञानराज खटिंग, कृष्णा जावळे, डाॅ.ज्ञानेश्वर हर्बक, प्रा.रमेश शिंदे, प्रदुम्न शिंदे, प्रा.राम कराळे , सुधीर देशमुख, सोपान पंडीत, राम पवार, प्रल्हाद गरड, श्याम पवार, व्यंकटेश शिंदे, रवींद्र रेड्डी, दीपक नागोरे, कल्याण राठोड, विजय पवार, शिवशंकर मनाळे, बाळासाहेब घाटोळ, चेतन औंढेकर, ॲड. सचीन पन्हाळे, डॉ.श्रीकांत ओव्हर यांच्यासह स्थानिक गाईड दीपक पोवार, प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी उत्साहाने या मोहीमा पार पाडल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!