चाचा नेहरूंना अभिवादन : सेलूतील नूतन कन्या शाळेत विविध कार्यक्रम 

चाचा नेहरूंना अभिवादन : सेलूतील नूतन कन्या शाळेत विविध कार्यक्रम 

भित्तीपत्रकाचे विमोचन, ग्रंथप्रदर्शन 

सेलू जि.परभणी : निसर्ग हा नेहमीच माणसाला भरभरून देत असतो. तेव्हा मानवाने निसर्गाप्रती सदैव कृतज्ञता व्यक्त करावयास हवी. निसर्गाचा समतोल साधायला हवा आणि हे संस्कार लहान वयातच मुलांवर रुजायला हवेत, असे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त कृषी सहाय्यक अधिकारी नंदकुमार चौधरी यांनी केले.

श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती सोमवारी, १४ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.‌ त्या वेळी चौधरी बोलत होते. मुख्याध्यापिका संगीता खराबे अध्यक्षस्थानी होत्या. या निमित्ताने स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन चौधरी यांनी केले. ग्रंथालयातील विविध उपक्रमांची माहिती ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे यांनी दिली.

संगीत शिक्षिका पूजा महाजन यांनी स्वागत गीत गायले. उपमुख्याध्यापक दत्ता घोगरे,यशवंत कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर, सुरेखा रामदासी, ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे कैलास मलवडे आदी उपस्थित होते. यानिमित्ताने चौधरी यांनी पाच हजार रुपयांचे ग्रंथ, तर सेवानिवृत्त संगीत शिक्षिका हेमलता देशमुख यांनी रुपये दोन हजार रुपयांचे ग्रंथ भेट म्हणून शाळेला दिले.

विद्यार्थिनींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संस्कृत शिक्षक यशवंत कुलकर्णी यांनी नेहरूजींच्या जीवनातील विचार मांडले. सहशिक्षिका कीर्ती राऊत, ग्रंथपाल शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दुर्गाई’ या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. भित्तीपत्रकाचे लेखन स्नेहा मुनेश्वर, श्रेया राऊत, ज्ञानेश्वरी रासवे, अक्षरा गलबे, श्रेया सोळंके, चैताली या विद्यार्थिनींनी केले. सूत्रसंचालन कैलास मलवडे, तर आभार सुरेखा रामदासी यांनी मानले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!