ENGINEERING : मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकांचे सेलूत वितरण; अपूर्वा पॉलिटेक्नीकमध्ये कार्यक्रम

ENGINEERING : मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकांचे सेलूत वितरण; अपूर्वा पॉलिटेक्नीकमध्ये कार्यक्रम

तंत्रशिक्षण मातृभाषेमध्ये उपलब्ध, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सहज समजण्यास मदत होणार आहे

सेलू जि.परभणी : मराठी भाषेमध्ये विकसित केलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या ( Engineering) पाठ्यपुस्तकांचा वितरण सोहळा श्रीराम प्रतिष्ठान संचालित अपूर्वा पॉलिटेक्नीकमध्ये पार पडला.
श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा.गजानन जाधव, विभागप्रमुख प्रा.श्याम वाघ आदींची उपस्थिती होती. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ,नवी दिल्ली व तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी मराठी भाषेमध्ये अभियांत्रिकी पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या पाठयपुस्तकांची निर्मिती केली आहे.
आता यापुढे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये शिक्षण घेता येणार असून, तंत्रशिक्षण मातृभाषेमध्ये झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सहज समजण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख स्वतःच्या मातृभाषेमध्ये करून घेता येणे सोयीचे होईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा अभ्यासक्रम आता सोपा वाटू लागेल व विद्यार्थ्यांची त्याबाबत रुची वाढेल. विद्यार्थ्यांनी येत्या काळामध्ये तंत्रशिक्षण मातृभाषेमध्ये घ्यावे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.संजय रोडगे यांनी यावेळी बोलतांना केले.या वेळी प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा.गजानन जाधव, विभागप्रमुख प्रा.श्याम वाघ आदींची उपस्थिती होती.

तंत्रशिक्षण मातृभाषेमध्ये झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सहज समजण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख स्वतःच्या मातृभाषेमध्ये करून घेता येणे सोयीचे होईल. विद्यार्थ्यांनी येत्या काळामध्ये तंत्रशिक्षण मातृभाषेमध्ये घ्यावे. या संधीचा लाभ घ्यावा.

– डॉ.संजय रोडगे,
अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान, सेलू

हेही वाचा – सेलू बाजार समितीची शेतमाल तारण कर्ज योजना

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!