कृषि यांत्रिकीकरण खरेदी : महाडिबीटी पोर्टलवर कागदपत्र अपलोड करण्याचे आवाहन

कृषि यांत्रिकीकरण खरेदी : महाडिबीटी पोर्टलवर कागदपत्र अपलोड करण्याचे आवाहन

कृषि यांत्रिकीकरण खरेदी : महाडिबीटी पोर्टलवर कागदपत्र अपलोड करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी तात्काळ लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन 

परभणी : सन 2022-23 मध्ये कृषि यांत्रिकीकरण व इतर महाडिबिटी योजने अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील इच्छुक लाभार्थी शेतकरी यांनी कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत ट्रक्टर व इतर ट्रक्टर चलीत औजाराकरीता महाडिबिटी प्रणालीद्वारे अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकरी यांची सोडतीद्वारे निवड झालेली असून, निवड यादी आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ लाभ घेण्यासाठी आपले कागदपत्र, अपलोड करण्यात यावे किंवा ज्या लाभार्थी शेतकरी यांना पूर्व संमती मिळाली असेल अशा शेतकरी यांनी ट्रक्टर व इतर ट्रक्टर चलीत औजारे तात्काळ खरेदी करुन देयके महाडिबिटी प्रणालीवर अपलोड करावीत जेणे करून निवड झालेल्या लाभार्थी शेतकरी यांना अनुदान अदायगी करणे सोयीची होईल. या बाबत काही अडचण असल्यास आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे.

हेही वाचा – रसिकांसाठी पर्वणी : प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा सेलूत सोमवारी प्रयोग

हेही वाचा – राष्ट्रीय पत्रकार दिन : परभणी जिल्हा माहिती कार्यालयात कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!