…तो अहंकार बढ़ेगा : गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज
सेलूतील संत श्री दादूपंथी मठ गोशाळेत कार्यक्रम, गोमाता पूजन, गोसेवकांचा सत्कार, मुक्त संचार गोठ्याची पाहणी
सेलू जि.परभणी : येथील श्री संत गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळेची गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांनी शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) सकाळी पाहणी केली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महाराज म्हणाले, “वर्तमान स्थिती में आगे बढ़ना कोई बड़ी बात नही; परंतु सेटिंग्स या जुगाड से आगे बढ़ेंगे, तो अहंकार बढ़ेगा और श्रद्धा, विश्वास के साथ सेवा भावसे आगे बढ़ेंगे, तो अहंकार से छुटकारा मिल जाएगा. फिर उन्नति, आरोग्य, आनंद की यात्रा सफलता की ओर प्रशस्त होगी.”
या वेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती, मदनलाल करवा, संजयकुमार मेहता, भगिरथ सारस्वत महाराज, शिवम सारस्वत, रतन दायमा, द्वारकादास करवा, हरमनदास करवा, पंकज झंवर, वल्लभ राठी, नंदकिशोर परताणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गोसेवेचे महत्त्व विषद करताना महाराजांनी सांगितले, ” प्रत्येकाने उत्तम आरोग्य, उन्नती आणि आनंद प्राप्तीसाठी गोमातेची मनातून सेवा करावी, युवकांनी एक दिवस एक घंटा गोशाळेमध्ये श्रमदान सेवा करावी, प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात गोमाता दर्शनाने करावी. गो ग्रास द्यावा.” या वेळी मोतीलाल भुतडा, रामेश्वर साबू, नंदलाल परताणी, जगदिश भुतडा, सुजित मालाणी, शाम मालाणी, रामेश्वर सोमाणी, राजेंद्र तोष्णीवाल, पंकज सोनी, संतोष काबरा, भिकुलाल कासट यांच्यासह भगवानगुरु, मनोहरगुरु, डॉ.रामाने, डॉ.ज्ञानेश्वर कदम, प्राजक्ता कुलकर्णी, डॉ.सचिन गायकवाड, डॉ. माऊली गात, बालाजी सवणे, लक्ष्मण गायकवाड, बालासाहेब रत्नपारखी, संदीप शेलार, अभिजीत शेलार, सदाशिव अप्पा वाघमारे, नितीन सातपुते आदींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने राधाकृष्ण महाराज यांनी मुक्त संचार गोठा, गोशाळेत गोमातेचे पूजन केले.
प्रास्ताविकातून शैलश तोष्णीवाल यांनी गोशाळेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन भगवान पावडे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील तसेच मंठा येथील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र करवा, गोविंद शेलार, सुरेंद्र तोष्णीवाल, शिवनारायण मालाणी, अविनाश बिहाणी, सूर्यकांत जाधव, जगन्नाथ पवार, कृष्णा काटे, गणेश बागडे, बबलू दायमा, श्रीनिवास काबरा, अनुप गुप्ता, विजय पांडे, रमेश काला, आनंद सोनी, अशोक शेलार आदींसह गोसेवकांनी परिश्रम घेतले.
उत्तम आरोग्य, उन्नती आणि आनंद प्राप्तीसाठी प्रत्येकाने गोमातेची मनातून सेवा करावी, युवकांनी एक दिवस एक घंटा गोशाळेमध्ये श्रमदान सेवा दिली पाहिजे. आपल्या दिवसाची सुरुवात गोमाता दर्शनाने करावी. गुळ आणि रोटीचा घास द्यावा, गोमातेच्या सानिध्यात काही काळ राहिल्याने आरोग्य उत्तम राहाते, असा अनुभव वैश्विक स्तरावर दिला जात आहे, असे गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांनी सांगितले. या निमित्ताने गोशाळेच्यावतीने कार्याध्यक्ष जगन्नाथ पवार, सुरेंद्र तोष्णीवाल यांनी महाराजांचे स्वागत केले. शैलेश तोष्णावाल यांनी गोशाळेच्या विविध उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे यांनी महाराजांचा सत्कार केला.