खूनी खेळ थांबवा : सेलूतील विविध संघटनांनी पाठविले राष्ट्रपतींना निवेदन
उपविभागीय अधिकार्यांना भेटून संयुक्त निवेदन, आंतरधर्मीय विवाह, लव जिहादवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी
सेलू जि.परभणी : दिल्ली येथील श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. खूनी खेळ थांबविण्यासाठी आंतरधर्मीय विवाह, लव जिहादवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना शनिवारी (१९ नोव्हेंबर) पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
सेलू येथील श्रीराम जन्मोत्सव समिती, महिला मंडळ सेलू, विश्व हिंदू परिषद सेलू, राष्ट्रीय सेविका समिती , शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, केशरी हिंदू वाहिनी, बजरंग दल, क्रांती फाउंडेशन, श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान, दुर्गा वाहिनी आदी सामाजिक व धार्मिक संघटनांनी हे निवेदन दिले आहे.
दिल्ली येथील श्रद्धाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या आफताबने, श्रद्धाने लग्नाची मागणी करताच घरातच तिच्या शरीराचे क्रूर पद्धतीने 35 तुकडे करून मोठ्या फ्रिजमध्ये ठेवले. सहा महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. ही घटना क्लिष्ट असूनही दिल्ली पोलिसांनी हा शोध लावून नराधमाला अटक केली. देशभरात श्रद्धा सारख्या हजारो निष्पाप मुलींचे जीव कुरुपणे चिरडले जात आहेत. आतापर्यंत हजारो हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांचे धर्मांतरण करून त्यांच्या बरोबर बळजबरी लग्न करणे आणि छळ करणे या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना वाढण्यासंबंधित कट्टर वाद्यांचे समर्थन असल्याचे निदर्शनास आले आहे; तसेच दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ ला संभाजीनगरला शिल्लेखान चौकात सय्यद अकबर या रिक्षावाल्याने ट्युशनला जाण्यासाठी त्याच्या रिक्षात बसलेल्या मुलींची छेड काढली. जीव वाचवण्यासाठी मुलीने रिक्षातून उडी मारली. सदर मुलगी आयसीयु मध्ये ऍडमिट आहे. आपला कायदा कमकुवत असल्याचा फायदा हे निधर्मी उचलत आहे. अशी घटना घडल्यानंतर संबंधित गुन्हेगाराला अटक होते आणि तो काही महिन्यांनी सुटला की पुन्हा हाच गुन्हा करतो. या पार्श्वभूमीवर ज्यांनी जो गुन्हा केला त्याला तीच शिक्षा व्हावी. असा कायद्यात बदल करावा तरच हे खूनी खेळ थांबतील. अशी मागणी तसेच लव जिहाद खुनी खेळ थांबण्यासाठी आंतरधर्मीय विवाहावर तात्काळ बंदी आणण्यात यावी. या प्रकरणातील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सेलू येथील विविध सामाजिक धार्मिक संघटना व सकल हिंदू समाज मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
सेलू येथील श्रीराम जन्मोत्सव समिती, महिला मंडळ सेलू, विश्व हिंदू परिषद सेलू, राष्ट्रीय सेविका समिती , शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, केशरी हिंदू वाहिनी, बजरंग दल, क्रांती फाउंडेशन, श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान, दुर्गा वाहिनी आदी सामाजिक व धार्मिक संघटनांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनावर श्रीमती ललिता गिल्डा, रूपाली ठाकूर, श्रीमती बागले, वनिता चाफेकर, रेखा अवचार, बबीता ठाकूर, अश्विनी घोगरे, कोठेकर, करुणा कुलकर्णी, आरती समेळ, रिता जयस्वाल, मंजुषा कुलकर्णी, पौर्णिमा जोहिरे, नागेश ठाकूर, नीरज लोया, जयसिंग शेळके, कपिल फुलारी, प्रशांत ठाकूर, प्रसाद काष्टे, गोविंद शर्मा, मनीष कदम, दत्ता कदम, शुभम महाजन, कृष्णा काटे, कृष्णा चव्हाण, अमर सिंदे, इंद्रजीत ठाकूर, किशोर पारेख, श्याम चाफेकर श्रीराम भाले, अवधूत बेंद्रे, कौस्तुभ कुलकर्णी, राम मोगल, रणवीर पवार, कुणाल वानखेडे, अभिषेक केशरखाने, देवा पवार, कृष्णा बाहेती, विश्वजीत ठाकूर,अर्जुन विष्णू, वेदांत राजवाडकर, सोहम घेवारे आदींच्या सह्या आहेत.