कापूस ₹ 9531 : सेलू बाजार समिती खरेदी हंगाम; सौदेबाजाराला सुरुवात
मुख्य प्रशासक संजय अब्दागिरे, सचिव राजीव वाघ, जिनिंग उद्योजक, शेतकऱ्यांची उपस्थिती
सेलू जि.परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा यंदाचा कापूस खरेदी हंगाम शनिवारी (१९ नोव्हेंबर) सुरू झाला. पहिल्या दिवशी सौदेबाजारात कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ५३१ रूपये भाव मिळाला.
बाजार समितीच्या यार्डात लिलाव झाला. समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी अनिल अरुणराव रोडगे (रा.रवळगाव ) यांनी आणलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ९,५३१ रुपये भाव मिळाला. या वेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक संजय अब्दागिरे, सचिव राजीव वाघ, बी.एस.ताठे; तसेच जिनिंग उद्योजक संचालक रामेश्वर राठी मामा, गोपाळ काबरा, आशिष बिनायके, समशेर सिंग, प्रवीण चांडक, नीलेश तायल महेंद्र पाल, प्रभुदयाल (बाळू ) मंत्री, रोहित कुमार; तसेच बाजार समितीचे कर्मचारी दिपक शिंगणे, बालासाहेब गायकवाड, वचिष्ठ हिंगे, सुबोध देशमुख, अशोक वाटोडे, राजेश गोरे, कैलास गलांडे, संदेश खंडागळे, राजेश गोरे, विष्णू मोरे आदींसह शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी बांधवानी कापसाची वाहने सकाळी नऊच्याआत मुख्य पाथरी रोडवरील कापूस यार्डात रांगेत लावून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य प्रशासक एस.व्ही.अब्दागिरे, सचिव राजीव वाघ यांनी केले आहे.
गेल्या हंगामात बाजार समितीमार्फत ६ नोव्हेंबरपासून लिलाव पद्धतीने कापूस खरेदी सुरू झाली. पहिल्याच दिवशी ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गुरुवारी (३० डिसेंबर २०२१) कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ३६० रुपये भाव उच्चांकी मिळाला आणि पहिल्यांदा कापूस दराने नऊ हजार पार केले. गतवर्षी २९ डिसेंबरपर्यंत १ लाख १४ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. यंदाच्या हंगामात पहिल्याच दिवशी कापूस साडे नऊ हजार पार गेला आहे. चढ उतार राहिला तरी आगामी काळात कापसाला चांगला भाव मिळेलच अशी चिन्हे आहेत.
हेही वाचा : खूनी खेळ थांबवा : सेलूतील विविध संघटनांनी पाठविले राष्ट्रपतींना निवेदन
हेही वाचा : …तो अहंकार बढ़ेगा : गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज