जिल्हा उपक्रमशील शिक्षक : सर्जेराव लहाने यांना सुंदरलाल सावजी पुरस्कार जाहीर 

जिल्हा उपक्रमशील शिक्षक : सर्जेराव लहाने यांना सुंदरलाल सावजी पुरस्कार जाहीर 

लवकरच समारंभपूर्वक वितरण होणार 

सेलू जि.परभणी : तालुक्यातील आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांना, जिंतूर येथील सुंदरलाल सावजी व्याख्यानमाला अंतर्गत परभणी जिल्हा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण होणार आहे.

लहाने हे आहेर बोरगाव येथील स्वामी विवेकानंद ग्रंथालयाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात समरस झालेले आहेत. नितीन माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी, खासकरून मुलींना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लहाने मोठे योगदान देत आहेत. त्यांनी वाचन लेखन चळवळ गतिमान केली आहे. सेलू नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांमध्ये साक्षरता आणि जागरूकता निर्माण करत आहेत. शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, यासाठीही ते पुढाकार घेताना दिसतात. त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक आजवरच्या योगदानाबद्दल सुंदरलाल सावजी स्मृती व्याख्यानमाला जिंतूरच्या वतीने जिल्हा उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी लहाने यांची निवड केली आहे. पुरस्काराबद्दल लहाने यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

हेही वाचा : कापूस ₹ 9531 : सेलू बाजार समिती खरेदी हंगाम; सौदेबाजाराला सुरुवात

हेही वाचा : खूनी:खेळ थांबवा : सेलूतील विविध संघटनांनी पाठविले राष्ट्रपतींना निवेदन

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!