मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष : केंद्र, राज्यसरकारच्या विरोधात सेलूत धरणे आंदोलन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष : केंद्र, राज्यसरकारच्या विरोधात सेलूत धरणे आंदोलन

मागणी : ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करावे

सेलू, जि.परभणी : सेलू तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोदी व शिंदे फडणवीस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा धिक्कार करीत, बुधवारी, 23 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन केले. ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करावे,खरीप पिक विमा सरसकट शेतकऱ्यांना वाटप करावा. पंतप्रधान किसान योजनेत वंचित शेतकऱ्यांचा समावेश करुन, बंद केलेले अनुदान पूर्ववत चालू करण्यात यावे. शेतकरी शेतमजुरांना 5000 रुपये पेन्शन द्यावी. सेलू शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. बंद करण्यात आलेले शेतकरी रेशन चालू करावे. सेलु- डिग्रस जहागीर रोडचे डांबरीकरण करा. आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांना देण्यात आले. आंदोलनात डिग्रस जहागिर, करडगाव,देऊळगाव गात , सेलू, झोडगाव, गुगळी धामणगाव गावातील नागरिक, शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ दत्तुसिंग ठाकूर, उद्धव पौळ, राजाभाऊ साखरे, सुभाष शहाणे, लक्ष्मण सावंत, विष्णू चव्हाण, रोहिदास हातकडके, विष्णू शिंदे, बालाजी मगर, शिवकुमार नावाडे, रामप्रसाद सुरवसे, नारायण पवार, ज्ञानेश्वर पौळ, धोंडीतात्या, शांताराम पौळ रत्नेश्वर पौळ, गोविंद पौळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!